शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
4
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
5
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
6
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
7
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
8
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
9
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
10
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
11
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
12
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
13
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
14
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
15
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
16
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
17
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
18
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
19
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
20
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत देण्यास कटिबद्ध- कृषिमंत्री अब्दुल सत्तार

By सुनील काकडे | Updated: September 23, 2022 18:34 IST

मंगरूळपिरात झाला हिंदू गर्व गर्जना मेळावा

वाशिम: संततधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सर्वेक्षण आणि पंचनाम्याचे आदेश प्रशासनाला यापूर्वीच देण्यात आले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासन वाऱ्यावर सोडणार नाही; तर भरीव आर्थिक मदत देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.आज, २३ सप्टेंबर रोजी मंगरुळपीर येथील जुन्या पंचायत समिती सभागृहात हिंदू गर्व गर्जना शिवसेना संपर्क अभियानांतर्गत पार पडलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार भावना गवळी होत्या. शिंदे गट जिल्हाप्रमुख महादेव ठाकरे, नवी मुंबईचे माजी नगरसेवक संजू आधारवाडे, तालुका प्रमुख मनिष गहुले, अनिल गावंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी खासदार गवळी यांनीही शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी विद्यमान राज्य सरकारचे सर्वंकष प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून पीक विमा कंपन्यांनी नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी पुढाकार घ्यावा; अन्यथास विमा कंपनीच्या प्रतिनिधींना रस्त्यावरही फिरू देणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. जिल्हाप्रमुख ठाकरे, संजय वाडे यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेतबांधावरील प्रयोगशाळेला सत्तार यांनी दिली भेट

अब्दुल सत्तार यांनी दाैऱ्यात मालेगांव येथील मालेगाव तालुका शेतकरी उत्पादक कंपनीने सुरु केलेल्या शेतबांधावरील प्रयोगशाळेलाही भेट दिली. मानव  विकास मिशन व कृषी विभागाच्या माध्यमातून जिल्ह्यात १३ ठिकाणी  शेतबांधावर प्रयोगशाळा सुरु करण्यात आल्या आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या निविष्ठांवरील खर्चात मोठी बचत झाली आहे. प्रयोगशाळेत ट्रायकोडर्मा, वेस्ट डिकम्पोझर, सी विड व पोटॅशीयम हुमेट बेस निविष्ठा, निम व करंज बेस निविष्ठा आणि सिलीकॉन बेस निविष्ठांची निर्मिती करण्यात येत असल्याची माहिती डॉ. माने यांनी मंत्री अब्दुल सत्तार यांना दिली.

टॅग्स :washimवाशिमAbdul Sattarअब्दुल सत्तार