शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंप वीज जोडणी : विदर्भातील कंत्राटदारांकडून निविदांकडे पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 05:42 IST

कृषीपंप वीज जोडणीच्या निविदांकडे विदर्भातील कंत्राटदारांनी पाठ फिरविली असून ते ‘लॉबी’ बनवून जास्त दर मागत असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली.

नागपूर : कृषीपंप वीज जोडणीच्या निविदांकडे विदर्भातील कंत्राटदारांनी पाठ फिरविली असून ते ‘लॉबी’ बनवून जास्त दर मागत असल्याची माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली. यासंदर्भात प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान प्रकाश गजभिये यांनी प्रश्न उपस्थित केला होता. पूर्व विदर्भातील कामांसाठी परिमंडळस्तरावर काढण्यात आलेल्या १४ निविदांपैकी १३ निविदांना व मंडळस्तरावर काढण्यात आलेल्या १६८ पैकी केवळ ८ निविदांना प्रतिसाद मिळाला. विदर्भातील कंत्राटदार ‘सीएसआर रेट’पेक्षा ३० टक्के अधिक दर मागत आहेत. यासंदर्भात चार वेळा बैठका झाल्या आहेत. राज्य शासनाने ८ टक्के अधिक दरावर काम देण्याची तयारी दाखविली आहे. मात्र तरीदेखील कंत्राटदार काम करायला तयार नाहीत. त्यांच्याशी चर्चा करुन सकारात्मक मार्ग काढण्यात येईल, अशी माहिती बावनकुळे यांनी दिली.राज्यातील इतर भागांमधील कंत्राटदार विभागाच्या दरानुसार काम करायला तयार आहेत. मात्र विदर्भातील कंत्राटदार ‘लॉबिंग’ करत आहेत. मात्र कुठल्याही स्थितीत निविदेचा दर ३० टक्क्यांहून वाढविण्यात येणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. राज्य शासनाने आतापर्यंत राज्यात ५ लाख १० हजार शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना वीज जोडणी दिली आहे. २ लाख ३५ हजार शेतकºयांच्या जोडण्या प्रलंबित आहेत. १५ आॅगस्टपासून जोडणीसाठी सुरुवात करण्यात येईल व डिसेंबर २०१९ पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल, असे बावनकुळे यांनी सांगितले.

टॅग्स :electricityवीजagricultureशेती