शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील कृषी महाविद्यालये परप्रांतीयांकडून ‘हायज्ॉक’ !

By admin | Updated: July 2, 2014 00:30 IST

खाजगी कृषी महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोट्यातून परप्रांतीय विद्यार्थ्यांंना सर्रास प्रवेश दिला जात असून, या प्रवेशापोटी त्या विद्यार्थ्यांंकडून लाखो रू पये डोनेशन घेतले जात आहे.

अकोला : राज्यातील खाजगी कृषी महाविद्यालयांमध्ये व्यवस्थापन कोट्यातून परप्रांतीय विद्यार्थ्यांंना सर्रास प्रवेश दिला जात असून, या प्रवेशापोटी त्या विद्यार्थ्यांंकडून लाखो रू पये डोनेशन घेतले जात आहे. या प्रकारामुळे कृषी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणार्‍या विदर्भ, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांंमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली आहे.राज्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांंना कृषी शिक्षण घेता यावे, यासाठी राज्य शासनाने कृषी विद्यापीठांतर्गत नवीन कृषी महाविद्यालये सुरू केली असून, जागादेखील वाढविल्या आहेत. तसेच खासगी कृषी महाविद्यालयांनाही अनुमती दिली आहे. राज्यात आजमितीस ६४ खासगी कृषी महाविद्यालये आहेत. यात सात उद्यानविद्या, १६ जैवतंत्रज्ञान व आठ कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत. यातील विदर्भात १६ कृषी, दोन उद्यानविद्या, एक जैवतंत्रज्ञान व एक कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा समावेश आहे. या सर्व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांंना महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण संशोधन परिषदेकडे (एमसीईएआर) ऑनलाईन अर्ज भरावे लागतात. एमसीईएआरकडून या अर्जाची गुणवत्ता यादी तयार केली जाते. तीन टक्के जागा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेनुसार इतर राज्यातील विद्यार्थ्यांंकरीता राखीव असतात. २0 टक्के जागांवर व्यवस्थापन समितीव्दारे प्रवेश दिला जातो. त्यासाठी एसीएईआरच्या यादीत विद्यार्थ्यांंचे नाव असणे अनिवार्य असते. म्हणूनच जो तीन टक्के केंद्रीय पध्दतीने प्रवेश दिला जातो, त्यामध्ये मोठय़ा प्रमाणात घोळ घातला जात आहे. या विद्यार्थ्यांंकडून लाखो रू पये डोनेशन घेऊन प्रवेश दिला जात असल्याचा आरोप विदर्भ, मराठवाड्यातील विद्यार्थ्यांंंकडून केला जात आहे. प्रवेश घेण्यासाठी या परप्रांतीय विद्यार्थ्यांंकडून प्रत्येकी आठ लाख रू पये घेतले जात असल्याचा आरोप होत आहे. कृषी अभ्यासक्र मासाठी प्रामुख्याने विदर्भ, मराठवाड्यातील कृषी महाविद्यालयांमध्ये हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने या महाविद्यालयांची सुरू वात करण्यात आली आहे, त्यालाच हरताळ फासला जात आहे.