शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अर्जेंटिनाशी कृषी क्षेत्रातील सहकार्य वाढविणार- कृषिमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2017 19:36 IST

सोयाबीन आणि डाळीच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी अर्जेंटिना उत्सुक असल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिली.

मुंबई, दि. 13 - सोयाबीन आणि डाळीच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनासाठी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सहकार्य करण्यासाठी अर्जेंटिना उत्सुक असल्याची माहिती कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज येथे दिली. अर्जेंटिनाच्या कृषी व फलोत्पादनाचे राष्ट्रीय संचालक ओमर ओदारदा, अर्जेंटिनाचे कॉन्सुलेट जनरल आलेयंरो मेयेरे आणि कृषी खात्याचे सहसचिव जीजस सिल्व्हेरिया या त्रिसदस्यीय अर्जेंटिनीयन शिष्टमंडळाने मंत्रालयात कृषिमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी कृषिमंत्री बोलत होते.कृषीमंत्री म्हणाले की,  कृषी तंत्रज्ञान क्षेत्रात अर्जेंटिनाने केलेली कामगिरी अतिशय प्रभावी असून, या तंत्रज्ञानाच्या मदतीने महाराष्ट्रातील कृषी व फलोत्पादन क्षेत्रात लक्षणीय बदल घडवून आणण्यासाठी अर्जेंटिनाशी कृषी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील सहकार्य वाढविण्यास महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असून अर्जेंटिनाने  देखील अशा प्रकारच्या सहकार्याची तयारी दर्शविली  आहे. कृषी प्रक्रिया उद्योगाला उभारी देण्यासाठी देखील या तंत्रज्ञानाचा मोठा फायदा महाराष्ट्राला होऊ शकेल.

अर्जेंटिनाला देखील दुग्धव्यवसाय, पोल्ट्री, मत्स्यव्यवसाय या क्षेत्रातील गुंतवणूकदारांची आवश्यकता असून भारतीय उद्योजकांनी अर्जेंटिनामध्ये गुंतवणूक करावी असे आवाहन ओमर ओदारदा यांनी यावेळी केले. कृषी क्षेत्रातील परस्पर सहकार्य वाढविण्यासाठी अर्जेंटिनामधील कृषी क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी अर्जेंटिना भेटीवर येण्याचे निमंत्रण देखील या शिष्टमंडळाने कृषिमंत्र्यांना दिले.