लोकमत न्यूज नेटवर्कवडगाव मावळ : राज्य सरकारने कृषी विभागाकडील अधिकारी व कर्मचारी मृद व जलसंधारण विभागाकडे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग होण्यापूर्वी कृषी विभागाचा सुधारित आकृतिबंध तयार करण्यासाठी, तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेच्या वतीने मावळ तालुक्यात काम बंद आंदोलन सोमवारपासून सुरू केले आहे. तालुक्यातील कृषी सहायक संघटनेच्या वतीने तालुका कृषी अधिकारी विनायक कोथंबीरे व तहसीलदारांना काम बंद आंदोलन सुरू केल्याचे, तसेच सहभागी झाल्याचे संमतीपत्र दिले आहे. या वेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष किरण बोऱ्हाडे, कार्याध्यक्ष विकास गोसावी, सचिव नागनाथ शिंदे, तसेच तालुक्यातील सर्व कृषी सहायक उपस्थित होते. संघटनेने दिलेल्या पत्रानुसार, राज्य कृषी सहायक संघटनेकडून राज्याचे कृषिमंत्री यांना कृषी विभागाच्या सुधारित आकृतिबंधाविषयी, तसेच कृषी सहायकांच्या विविध प्रलंबित मागण्यांविषयी कळविण्यात आल्याचे नमूद केले असून, या मागण्यांसाठी संघटनेकडून १२ जून २०१७ पासून राज्यभर आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. तसेच सोमवारपासून (दि. १०) संघटनेच्या निर्णयानुसार बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी होण्यासाठी तालुक्यातील सर्व कृषी सहायक बेमुदत काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत.
कृषी संघटनेचे काम बंद आंदोलन
By admin | Updated: July 11, 2017 00:39 IST