शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील कोथळे खून खटला वकील न दिल्याने लांबणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:37 IST

उज्ज्वल निकम; पुढील सुनावणी ११ मे रोजी

सांगली : पोलीस कोठडीतील अनिकेत कोथळे खूनप्रकरणी अटकेत असलेल्या सातही संशयितांनी अजून वकील न दिल्याने हा खटला लांबणीवर पडला आहे. दरम्यान, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी गुरुवारी ‘सीआयडी’च्या अधिकाऱ्यांकडून तपासाची तसेच दाखल केलेल्या दोषारोपपत्राची सर्व माहिती घेतली. मुख्य संशयित बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे याने न्यायालयास पत्र लिहून पोलीस कोठडीचे रजिस्टर व स्वत:च्या कॉल डिटेल्सची माहिती द्यावी, अशी मागणी केली आहे.अनिकेत कोथळे खून खटला व हिवरे (ता. खानापूर) येथील तीन महिलांच्या खून खटल्यात निकम यांची नियुक्ती झाली आहे. या दोन्ही खटल्याच्या सुनावणीसाठी ते गुरुवारी सांगलीत आले होते. कोथळे खून खटल्यात बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटेसह सात संशयित आहेत. सध्या सर्वजण न्यायालयीन कोठडीत आहेत. एकाही संशयिताने वकील न दिल्याने खटल्याची अजूनही सुनावणी सुरू होऊ शकली नाही. निकम यांनी सीआयडीचे पोलीस उपअपधीक्षक मुकुंद कुलकर्णी यांच्याकडून तपासाची माहिती घेतली. साक्षीदार किती आहेत? त्यांचे जबाब नोंदविले आहेत का? याचीही माहिती घेतली. त्यानंतर ते बारा वाजता जिल्हा न्यायालयात दाखल झाले. जिल्हा सत्र न्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांच्या न्यायालयात कोथळे खटल्याची सुनावणी होती. पुढील सुनावणी ११ मे रोजी ठेवण्यात आली आहे.हिवरे तिहेरी खून खटल्याची ११ मे रोजी सुनावणीहिवरेतील तीन महिलांच्या खून खटल्याची जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. काकतकर यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. साक्षीदारांनी यादी तयार करून सुनावणीची तारीख निश्चित करण्याचा निर्णय झाला. यासाठी ११ मे रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :Aniket Kothale Murderअनिकेत कोथळे मृत्यूप्रकरण