शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वय वर्षे 37 अन् पगार घेतो 78 कोटी; सर्वाधिक वेतन मिळवणाऱ्या तरुणांमध्ये लातूरचे अभय भुतडा देशात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 07:16 IST

अभय भुतडा यांनी आजवर पूनावाला फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक, व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले असून, सध्या ते पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडचे कार्यकारी संचालक आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क  लातूर : देशात सर्वाधिक वेतन मिळविणाऱ्यांच्या यादीत चौथ्या, तर ४० पेक्षा कमी वयोगटात प्रथम क्रमांकावर लातूरचे अभय सुरेशचंद्र भुतडा यांचे नाव झळकले आहे. त्यांनी आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ७८.१ कोटी रुपये इतके वेतन मिळविले. ३७ वर्षीय अभय भुतडा यांनी आजवर पूनावाला फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडचे सहसंस्थापक, व्यवस्थापकीय संचालक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले असून, सध्या ते पूनावाला फिनकॉर्प लिमिटेडचे कार्यकारी संचालक आहेत. 

‘ए ए प्लस’चे रेटिंग पहिल्याच वर्षातभुतडा यांच्या अधिपत्याखाली कंपनीने प्रथम वर्षातच नफा मिळवत केअर रेटिंग्स लिमिटेडकडून ‘ए ए प्लस’चे क्रेडिट रेटिंग मिळविले.  उद्योग व्यवसायाचे डिजिटलायझेशन, जोखीम व्यवस्थापन आणि कॉर्पोरेट गव्हर्नन्स, तसेच नवे व्यवसाय विकसित करण्याला त्यांनी प्राधान्य दिले. 

नोकरी करत शिक्षण, उद्योगात भरारीn अभय यांचे वडील सुरेशचंद्र भुतडा हे लातूरमध्ये किराणा व्यवसायातील मोठे व्यापारी आहेत. अभय यांनी लातूरच्या व्यंकटेश विद्यालयात व राजर्षी शाहू महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर पुढील उच्च शिक्षण पुण्यात पूर्ण केले. ते सीए झाले. n विशेष म्हणजे त्यांनी नोकरी करत उच्च शिक्षण पूर्ण केले. वडील सुरेशचंद्र, आई सरोजादेवी, पत्नी तृप्ती, भाऊ विनय, आशुतोष तसेच चुलते लक्ष्मीरमण व रमेश भुतडा यांचा स्नेह व पाठबळ अभय यांच्यासाठी प्रेरणादायी राहिले आहे.

आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही योगदान आरोग्य, शिक्षण क्षेत्रांत सीएसआरद्वारे त्यांनी योगदान दिले आहे. उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी अभय यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.