धुळेः भाजपाचे आमदार अनिल गोटे आणि केंद्रीय राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. दोघांनीही पत्रकार परिषद घेऊन एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत. भामरेंनी गोटेंवर गंभीर आरोप केले आहेत. सुभाष भामरे म्हणाले, मी केंद्रीय नगरसेवक आहे. पण धुळ्यातील नगरसेवकपदासाठी कोण उभं राहतंय हे मला माहीत आहे. आता ते माझ्या मुलाच्या मागे लागले आहेत. माझा मुलगा बाहेरून शिकून आला आहे. तो गेल्या आठ महिन्यांपूर्वी धुळ्यात आला असून, राजकारणात नाही.तीन मित्रांच्या मदतीनं कॅन्सर सेंटर काढतोय. त्यासाठी एचडीएफडीकडून 17 कोटींचं कर्जही काढलंय. तर त्यांना सरकारकडून 45 कोटी मिळाल्याचा आरोप काही जण करत आहेत. सगळ्यांनी मिळून या शहराचा विकास करावा. मी धुळे शहराच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. मी सगळ्यांच्या हातात सत्ता दिलेली आहे. काहींनी शहराची वाट लावली आहे. भाजपामध्ये सध्या गुंडांना अधिक महत्त्व मिळत आहे, असा आरोपही भामरे यांनी केला आहे. त्याला गोटे यांनीही चोख प्रत्युत्तर दिलं आहे.भाजपामध्ये जातीयवाद चालत नाही. गुंडगिरीमुक्त शहर आम्हालाही हवंय. गुंडांच्या शुद्धीकरणाला माझा विरोध असल्याचं गोटेंनी स्पष्ट केलं आहे. तसेच माझ्याविरोधात करण्यात आलेले आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचंही गोटे म्हणाले आहेत. त्यामुळे या दोघांमधील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
गुंडांच्या शुद्धीकरणाला माझाही विरोध- अनिल गोटे
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 13:41 IST