शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

पुन्हा सनातनवर संशय!

By admin | Updated: October 29, 2015 01:25 IST

पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाडला अटक झालेली असतानाच आता डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणीही सनातन संस्था रडारवर आली आहे.

मुंबई : पुरोगामी विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी सनातन संस्थेचा साधक समीर गायकवाडला अटक झालेली असतानाच आता डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणीही सनातन संस्था रडारवर आली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) सनातनशी संबंधित दोघांच्या हालचालींवर आपली नजर असल्याचे बुधवारी उच्च न्यायालयात स्पष्ट केले. या दोन संशयितांची नावे सीबीआयने बुधवारी बंद लिफाफ्यात कोर्टाला सादर केली. दाभोलकर व पानसरे यांच्या हत्येप्रकरणी त्यांच्या मुलांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी न्या. रणजित मोरे आणि न्या. राजेश केतकर यांच्या खंडपीठापुढे होती. गेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने सीबीआय व विशेष तपास पथकाला (एसआयटी) तपासासंदर्भातील अहवाल सादर करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार सीबीआयने दाभोलकर हत्या प्रकरणाचा तर एसआयटीने पानसरे हत्येसंदर्भातील तपास अहवाल सादर केला. दाभोलकर हत्येचा तपास समाधानकारक नसल्याचे सांगत उच्च न्यायालयाने सीबीआयवर ताशेरे ओढले. तथापि, एसआयटी करीत असलेला कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या तपासाबाबत न्यायालयाने समाधान व्यक्त केले. नव्याने तपासाचा सुधारित अहवाल ३० नोव्हेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश खंडपीठाने सीबीआय व एसआयटीला दिले. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांची कमतरताच्सीबीआय या तपासासाठी स्वतंत्र अधिकारी नेमू शकत नाही का? अशी विचारणा खंडपीठाने केल्यावर अ‍ॅड. रिबेका यांनी पश्चिम महाराष्ट्रासाठी केवळ ११ तपास अधिकारी आहेत. त्यामुळे पुण्याला अधिकारी पाठवू शकत नसल्याचे सांगितले. च्अधिकाऱ्यांच्या कमतरेमुळे या तपासाला विलंब होत आहे. तुमच्या (सीबीआय) तुलनेत एसआयटीने पानसरे हत्येप्रकरणात समाधानकारक काम केले आहे. तपासासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर केला आहे, असेही खंडपीठाने सुनावले.याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी तपास अधिकाऱ्यांंमध्ये समन्वय नसल्याचे खंडपीठाला सांगितले. सीबीआयचे तपास अधिकारी नवी मुंबईत असतात आणि तपास पथक पुण्यात आहे. त्यामुळे तपासाला विलंब होत असल्याचे अ‍ॅड. अभय नेवगी यांनी खंडपीठाला सांगितले. त्यावर अ‍ॅड. रिबेका यांनी, अधिकाऱ्यांचा त्यांच्या पथकाशी दररोज संवाद असतो; तसेच आठवड्यातून ते एकदा पुण्याला जातात, असे सांगितले. कोर्टाची नाराजीसीबीआयचा अहवाल पाहून खंडपीठाने नाराजी व्यक्त करत तपास समाधानकारक नसल्याचे म्हटले. सीबीआयने चार आठवडे काहीच केले नाही. मडगाव बॉम्बस्फोटातील फरार आरोपी रुद्र पाटीलचे काय, अशी विचारणा खंडपीठाने सीबीआयकडे केली. दाभोलकर हत्या प्रकरणात रुद्र पाटीलची भूमिका स्पष्ट करणारे पुरावे हाती लागले नसल्याचे सीबीआयच्या वकील रिबेका गोन्साल्विस यांनी सांगितले.बेवारस मृतदेह रुद्रगौडाचा?बेळगाव : जेष्ठ कन्नड साहित्यिक आणि पुरोगामी नेते एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणातील संशयित मारेकऱ्याच्या रेखाचित्राशी साम्य असणारा एक मृतदेह खानापूरच्या जंगलात सापडला. हा मृतदेह संशयित मारेकरी सनातनचा बेपत्ता साधक रुद्रगौडा पाटील याचाच असल्याचे वृत्त सोशल मीडियावर फिरू लागले. काही वाहिन्यांनीही ते देण्यास सुरुवात केल्यामुळे बुधवारी खळबळ उडाली. पोलिसांनी किंवा इतर तपास यंत्रणांनी याला अद्याप दुजोरा दिलेला नाही. उत्तर विभागाचे पोलीस महासंचालक उमेशकुमार यांनीदेखील मृतदेहाची ओळख पटली नसल्याचे सांगितले.