शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

समितीच्या अहवालानंतर वीजखरेदीचा निर्णय

By admin | Updated: August 3, 2016 03:45 IST

भाटिया समितीच्या अहवालानंतर घेण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली.

मुंबई : राज्यातील साखर कारखान्यांच्या सहवीज प्रकल्पातून तयार झालेली २ हजार मेगावॅट वीज खरेदी करण्याचा निर्णय यासंदर्भात नेमण्यात आलेल्या भाटिया समितीच्या अहवालानंतर घेण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत दिली. शेकापचे जयंत पाटील यांनी याबाबतची लक्षवेधी उपस्थित केली होती. शेतक-यांना एफ.आर.पी. देता यावी, यासाठी साखर कारखान्यांनी वीज निर्मिती प्रकल्प सुरू करण्याचे ठरविले आहे. मात्र त्यासाठीचे इन्फ्रास्टक्चर क्लिअरन्स प्रलंबित असल्याने वीज वितरण कंपनीबरोबर खरेदी करण्यात अडचणी येत असल्याबाबत शेकापचे जयंत पाटील, भाजपाचे प्रशांत परिचारक यांनी लक्षवेधी मांडली होती. यावेळी बावनकुळे म्हणाले की, अपारंपारिक ऊर्जा धोरणानुसार सहवीज निर्मिती प्रकल्पांतून १ हजार मेगावॅट वीज निर्मिती करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यापूर्वीच्या सरकारने दोन हजार मेगावॅट वीज निर्मितीस दिलेल्या मंजूरीपैकी जळपास १ हजार १९५ मेगावॅट वीजेची निर्मिती झाली आहे. त्यामुळे नवीन ऊर्जा निर्मिती करणा-या साखर कारखान्यांना महाऊर्जाकडून परवानगी दिली जात नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सहवीज निर्मिती प्रकल्पातून ऊसाच्या चिफाडापासून जी वीज निर्मिती केली जाते ती वीज खरेदी करण्याचे धोरण राज्य सरकारने स्विकारले आहेत. ज्या कारखान्यांची वीज निर्मिती करण्याची क्षमता असेल, अशा कारखान्यांकडून भाटीया समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर वीज खरेदी करण्याचा निर्णय गळीत हंगामापूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.>शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला जाईलसाखर कारखान्यांच्या वीज निर्मितीला २ रुपये प्रतियुनीट खर्च येतो. पण त्याची खरेदी ६ रुपये ९० पैसे या दराने करावी लागते. तसेच ही वीज १ रुपये २० पैसे या दराने शेतक-यांना द्यावी लागते. यामधील खर्चाचा बोजा सरकार किंवा वीज निर्मिती कंपनीलाच सोसावा लागतो. वीज निर्मिती कंपनीवर २२ हजार कोटींचे कर्ज आहे. दरवर्षी वाढणारा आर्थिक नुसानीचा वाढता आकडा वाढत आहे. सात प्रकल्प बंद पडले आहेत. याबाबत विचार करून शेतक-यांच्या हिताच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.