शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

तरुणी गूढरीत्या बेपत्ता झाल्यानंतर युवकाची आत्महत्या, आंबोलीत घडला प्रकार, कारमध्ये सापडला रक्ताचा सडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 01:01 IST

पंजाब येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून आणलेल्या युवक जोगिधर बलविंदरसिंग वीरग (वय 25)याने आंबोली येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली.

सावंतवाडी, दि. 20 - पंजाब येथून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून आणलेल्या युवक जोगिधर बलविंदरसिंग वीरग (वय 25)याने आंबोली येथील एका हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. हा तरुण मंगळवारी दुपारपासून आंबोली परिसरात संशयितरीत्या फिरत होता.तसेच त्याने आपली कार आंबोलीपासून चार किलोमीटर अंतरावर उभी करून ठेवली होती. या कारमध्ये रक्ताचे डाग पोलिसांना आढळून आले असून, या तरुणासोबत आलेल्या मुलीचा पोलिसांना अद्याप शोध लागलेला नाही. पंजाब पोलीस गेले चार दिवस या युवकाच्या मागावर असून, ते आंबोलीत दाखल झाले आहेत.याबाबतची माहिती आंबोली पोलीस दूरक्षेत्राचे हेडकॉन्स्टेबल विश्वास सावंत यांनी दिली आहे. पोलिसांकडून कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून, सायंकाळी उशिरा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सांगेली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला. पंजाब येथील चंदीगढ पोलीस आले असून, कारमध्ये रक्ताचे डाग व कोयती आढळले आहेत. पोलिसांनी कोयती जप्त केली आहे. मृत तरुणाचे नातेवाईक उद्यापर्यंत आंबोली येथे पोहोचणार आहेत. दरम्यान, सोबत आणलेल्या अल्पवयीन तरुणीची हत्या केली की नाही, याबाबत अद्याप प्रश्नचिन्हचं आहे. त्यामुळे पोलीस त्या तरुणीचा शोध घेत आहेत. पंजाब पोलीस आंबोली पोलिसांच्या मदतीने आंबोलीपासून आजरापर्यंत सर्वत्र शोध घेत आहेत. आत्महत्या केलेल्या तरुणाने हॉटेलच्या रूममध्ये साबणाने एक संदेश लिहून ठेवला आहे, यात त्याने मी चांगला आहे. सर्वांनी काळजी घ्यावी, असं त्यानं लिहिलं आहे.