शहरं
Join us  
Trending Stories
1
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
2
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
3
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
4
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
5
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
6
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
7
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
8
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
9
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
10
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
11
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
12
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
13
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
14
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
15
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
16
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...
17
"आई...मी त्याला मारून टाकलं, खोलीत बॉडी पडलीय"; मोठ्या बहिणीनं छोट्या भावाला का मारले?
18
ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेची रोमँटिक केमिस्ट्री, 'आरपार' सिनेमाचं पहिलं गाणं रिलीज
19
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
20
राज कुंद्राने आशीर्वाद घेताच केली किडनी ऑफर, ऐकून काय म्हणाले प्रेमानंद महाराज? जाणून आश्चर्य वाटेल

बलात्कार पीडितेशी विवाहानंतरही गुन्हा रद्द नाही

By admin | Updated: July 10, 2016 04:05 IST

मुलीवर बलात्कार करून तिच्याशी विवाह करणाऱ्या आरोपीवरील गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, आरोपी आणि पीडितेमधील तडजोडीला

मुंबई : मुलीवर बलात्कार करून तिच्याशी विवाह करणाऱ्या आरोपीवरील गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून, आरोपी आणि पीडितेमधील तडजोडीला कायद्यामध्ये स्थान नाही, असे उच्च न्यायालयाने आरोपीची याचिका फेटाळताना म्हटले.मोहम्मद फैझन आमीर खान याने त्याच्या लिव्ह-इन पार्टनरला विवाहाचे आमिष दाखवून २०१४पासून वारंवार तिच्यावर बलात्कार केला. याबद्दल पोलिसांनी त्याच्यावर भारतीय दंडसंहिता कलम ३७६ अंतर्गत गुन्हा नोंदवला.खानच्या म्हणण्यानुसार, त्याच्यात आणि त्याच्या जोडीदारामध्ये गैरसमज निर्माण झाला. त्यामुळे त्याच्या जोडीदारानेने पोलिसांत तक्रार केली. आता या दोघांमधील गैरसमज दूर झाले असून, त्यांनी विवाह केला आहे. त्यामुळे खानविरुद्ध नोंदविण्यात आलेला गुन्हा रद्द करण्यात यावा.आरोपीला त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविल्याचे समजले त्या वेळी आरोपी पीडितेशी विवाह करण्यास तयार झाला. आरोपीचे वर्तन समजून घ्यायला हवे. आपल्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे आणि पोलीस शोधत आहेत, हे समजल्यावर आरोपीने मुद्दाम पीडितेशी विवाह केला,’ असे निरीक्षण न्या. नरेश पाटील व न्या. पी. डी. नाईक यांच्या खंडपीठाने नोंदवले. आरोपीने पीडितेशी २९ एप्रिल रोजी विवाह केला आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३० एप्रिल रोजी त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पीडितेने लगेचच गुन्हा रद्द करण्यासाठी संमतीपत्र दिले. एकंदरीत घटनेवरून आरोपीचे वर्तन संशयास्पद आहे. त्यामुळे आरोपीने पीडितेशी विवाह केला असला तरी आम्ही त्याच्यावरील एफआयआर रद्द करू शकत नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, हत्या, बलात्कार, दरोडा इत्यादींसारखे गुन्हे तडजोड करून रद्द केले जाऊ शकत नाहीत, असेही खंडपीठाने स्पष्ट केले.सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, २०११मध्ये आरोपी आणि पीडितेमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. २०१४मध्ये आरोपीला मुंबईमध्ये नोकरी मिळाल्याने आरोपीने पीडितेला त्याच्याबरोबर उत्तर प्रदेशहून मुंबईत येण्यास सांगितले. मुंबईत हे दोघेही एकत्र राहत होते. या दोघांमध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले. पीडितेने त्यास विरोध केला नाही; कारण आरोपीने तिला विवाहाचे खोटे आश्वासन दिले. जानेवारी २०१६मध्ये आरोपी पीडितेला न सांगताच उत्तर प्रदेशला परत गेला. तिने त्याच्याशी संपर्क केला असता आरोपीने मुंबईस परत येण्यास नकार दिला. तसेच तिच्याशी विवाह करण्यासही नकार दिला. त्यामुळे मुलीने त्याच्याविरुद्ध पोलीस तक्रार केली. (प्रतिनिधी)