टाकळी ढोकेश्वर (अ.नगर): गावात कायमस्वरूपी डीजे बंद करण्याचा ठराव टाकळी ढोकेश्वरच्या ग्रामसभेने केला आहे. डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे पंकज खिलारी याचा गेल्या आठवड्यात मृत्यू झाला होता. ‘लोकमत’ने या विषयाला वाचा फोडली. ग्रामसभेने प्रजासत्ताक दिनी डीजे बंदीचा ठराव केला. मंगळवारी सरपंच सुनीता झावरे यांच्या अध्यक्षतेखालील ग्रामसभेत त्यावर चर्चा झाली. त्याला गावातील तरुणांनी समर्थन दिले. (प्रतिनिधी)
तरुणाच्या मृत्यूनंतर डीजे बंदीचा ठराव
By admin | Updated: January 28, 2016 01:36 IST