शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
4
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
5
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
6
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
7
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
8
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
9
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
10
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
11
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
12
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
13
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
14
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
15
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
16
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
17
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
18
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
19
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
20
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...

शासकीय नोकरीत नियुक्तीनंतर कर्मचारी झाले चक्क दिव्यांग; लाभासाठी बनावट कागदपत्रे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 07:04 IST

एक टक्का वाढ :बदली आणि इतर लाभांसाठी घेतली बनावट प्रमाणपत्रे?

सुधीर लंके

अहमदनगर : राज्य शासनाच्या नोकरीत नियुक्तीच्या वेळेस एकूण कर्मचाऱ्यांपैकी केवळ ०.३४ टक्के दिव्यांग कर्मचारी होते; मात्र आजमितीला दीड टक्के कर्मचारी दिव्यांग असल्याचे शासकीय कर्मचारी कोषातील आकडेवारी सांगते. नियुक्तीनंतर एवढे कर्मचारी दिव्यांग झाले कसे? हा प्रश्न आहे. 

नियुक्तीवेळी दिव्यांग नसलेले कर्मचारी नंतर अपघात अथवा आजारपणामुळे दिव्यांग बसू शकतात. पूर्वी सहा प्रकारांबाबत दिव्यांग प्रमाणपत्र दिले जात होते. २०१६ च्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियमानुसार दिव्यांगत्वाचे २१ प्रकार आहेत. त्यामुळेही संख्या वाढू शकते. मात्र, विविध जिल्हा परिषदांच्या  बदली प्रक्रियांमध्ये अनेक कर्मचारी हे दिव्यांग नसताना केवळ बदली व इतर लाभ घेण्यासाठी दिव्यांग बनतात असे आढळले आहे. जिल्हा रुग्णालयांतून त्यांनी अशी प्रमाणपत्रे मिळविली आहेत. तर काहींनी बनावट प्रमाणपत्रेच सादर केली आहेत.

प्रमाणपत्रे देणारी यंत्रणाच संशयास्पद शासन आदेशानुसार जिल्हा व महापालिका रुग्णालये, वैद्यकीय महाविद्यालये येथील त्रिसदस्यीय समिती दिव्यांगत्वाचे प्रमाण ठरवून तसे प्रमाणपत्र देते. ४० टक्के दिव्यांगत्व असणाऱ्या व्यक्तीला शासकीय लाभ मिळतात. या प्रमाणपत्रांची नंतर शहानिशाच होत नाही. बीड जिल्हा परिषदेने केलेल्या फेरतपासणीत ५२ दिव्यांग कर्मचारी असे आढळले जे ४० टक्के दिव्यांग नसताना शासकीय रुग्णालयाने तसे प्रमाणपत्र वितरित केले होते. यावरून प्रमाणपत्र देणारी शासकीय रुग्णालयांतील प्रक्रियेबाबत संशय निर्माण झाला आहे. 

अनेक कर्मचारी दिव्यांग नसताना या प्रमाणपत्रांचे फायदे घेतात हे खरे आहे. त्यामुळे शासनाने जातपडताळणीप्रमाणे आता दिव्यांग प्रमाणपत्रांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला आहे. शासकीय नोकऱ्यांतील दिव्यांगांचीही अशी पडताळणी होईल. यातून बनावट दिव्यांगांचा शोध लागून कारवाई होईल. - बच्चू कडू, मुख्य मार्गदर्शक, दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियान