शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

अखेर राज्यातील ४९२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

By admin | Updated: April 21, 2017 23:54 IST

गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या पोलीस दलातील निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांना (जीटी) अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्यातील ४९२ निरीक्षकांच्या बदल्या

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उत्सुकता लागून राहिलेल्या पोलीस दलातील निरीक्षकांच्या सर्वसाधारण बदल्यांना (जीटी) अखेर मुहूर्त मिळाला आहे. राज्यातील ४९२ निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी रात्री उशिरा त्याबाबतचे आदेश पोलीस मुख्यालयातून जारी करण्यात आले.मुंबई, नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील ५०हून अधिक अधिकाऱ्यांचा त्यात समावेश आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना नवीन जागी हजर होण्यासाठी त्वरित कार्यमुक्त करण्याचे आदेश घटकप्रमुखांना देण्यात आले आहेत.दरवर्षी ‘जीटी’ या साधारण मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होतात. या वेळी मात्र एक महिन्यापूर्वी बदल्यांचे आदेश जारी करून अधिकाऱ्यांना सुखद धक्का दिला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक वर्षे सुरू होण्यापूर्वी बदलीच्या ठिकाणी जाता येणार आहे. मुंबई आयुक्तालयात आठ वर्षे व अन्य आयुक्तालय व परिक्षेत्रात सहा वर्षे आणि एका जिल्ह्यात दोन वर्षांहून अधिक काळ सेवा पूर्ण झालेल्या राज्यभरातील २६७ निरीक्षक व विनंती केलेल्या २१५ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यांना त्वरित नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी घटकप्रमुखांनी कार्यमुक्त करावे, असे आदेश महासंचालकांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)