शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

अखेर दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर

By admin | Updated: June 12, 2017 17:26 IST

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी / मार्च 2017मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल येत्या उद्या १३ जून रोजी दुपारी १ वाजता जाहीर केला जाणार

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 12 - महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी / मार्च 2017मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल येत्या उद्या 13 जून रोजी दुपारी 1 वाजता जाहीर केला जाणार आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांची दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर निकालाच्या तारखांविषयीची खोटी माहिती फिरत होती, अखेर राज्य मंडळाकडून निकालाच्या तारखेची अधिकृत घोषणा करण्यात आल्याने या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. दरवर्षी दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जातो, यंदा निकाल जाहीर होण्यास एक आठवडा विलंब झाला आहे. त्यामुळे आपल्याला किती टक्के गुण मिळाले याबाबतची विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता ताणली गेली आहे. दहावीच्या परीक्षेसाठी 14 लाख विद्यार्थ्यांनी मंडळाकडे आवेदन पत्रे भरली होती. राज्य शासनाने अध्यादेश काढून चित्रकला, संगीत आदी कला विषयांच्या गुणांचा समावेश दहावीच्या गुणपत्रिकेत करण्याचा निर्णय घेतला. ऐनवेळी कलागुणांची नोंद करावी लागल्याने दहावीचा निकाल लावण्यास विलंब लागल्याचे सांगण्यात येत आहे. तुम्ही दहावीचा निकाल एसएमएसवरही मिळवू शकता. बीएसएनएल ग्राहकांनी MHSSC <स्पेस><सीट नंबर> आणि 57766 या नंबरवर एसएमएस पाठवू शकता, तसेच आयडिया, व्होडाफोन, रिलायन्स, टाटा डोकोमो आणि बीएसएनएल नेटवर्क धारकांनी MAH10<स्पेस><रोल नंबर> टाइप करून 58888111 या नंबरवर एसएमएस पाठवावा.

- इथे पाहता येईल 10वीचा निकाल

www.mahresult.nic.in

 www.result.mkcl.org

www.maharashtraeducation.com