शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

अखेर उपचाराअभावी त्या वाघाचा मृत्यू, वनविभागाच्या उदासीनतेनं घेतला वाघाचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2018 16:37 IST

चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुुली बिटात आढळलेल्या जखमी वाघाचा रविवारी दुपारी उपचाराविना दुर्दैवी मृत्यू झाला. 21 फेब्रुवारी रोजी सांयकाळी वाघ बसून असल्याचे दिसून आले होते. त्याच्या उजव्या पायाला व डोक्यावर गंभीर जखमा होत्या. त्यामुळे त्याला उपचाराची नितांत गरज होती.

चंद्रपूर : चिमूर वनपरिक्षेत्रातील भान्सुुली बिटात आढळलेल्या जखमी वाघाचा रविवारी दुपारी उपचाराविना दुर्दैवी मृत्यू झाला. 21 फेब्रुवारी रोजी सांयकाळी वाघ बसून असल्याचे दिसून आले होते. त्याच्या उजव्या पायाला व डोक्यावर गंभीर जखमा होत्या. त्यामुळे त्याला उपचाराची नितांत गरज होती.चंद्रपूर येथील मुख्य वनसंरक्षक विजय शेळके यांनी प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) यांच्याकडे वाघाला सुन्न करण्याचे इंजेक्शन देण्याची परवानगी मागितली होती. शनिवारी रात्री परवानगी मिळाली. तोपर्यंत उशीर झालेला होता. आज दुपारी सुन्न करण्याचे इंजेक्शन देण्यासाठी नऊ जणांची चमू घटनास्थळी आली. मात्र तत्पूर्वी वाघाने जगाचा निरोप घेतला होता. उपचारासाठी वाघाला सुन्न करण्याचे इंजेक्शन देण्याची परवानगी वेळीच मिळाली असती तर वाघाला वाचविता आले असते, असे बोलले जात आहे. वाघाचा मृतदेह नजीकच्या खडसंगी येथे हलविले आहे.ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पापासून 20 किमी अंतरावरील भान्सुली जंगलातील कक्ष क्रमांक पाचमध्ये गाव तलावाजवळ जखमी अवस्थेतील वाघ वनकर्मचारी व नागरिकांना दिसला होता. जखमी असल्यामुळे तो दुसरीकडे जाऊ शकत नव्हता. यानंतर वन अधिकाऱ्यानी गुरुवारी दुपारी जखमी वाघाच्या जवळ कॅमेरे लावून त्याच्या हालचाली टिपण्यात आल्या. त्यामध्ये वाघाच्या शरीरावर असलेल्या जखमा व पशू चिकित्सकाचा अहवाल मुख्य वन संरक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला. वाघाला असलेल्या जखमा व पशु चिकित्सक यांच्या अहवालाचे निरीक्षण करून जखमी वाघाला ट्रॅक्युलायझेशन करण्याची परवानगी पीसीसीएफ नागपूर यांनी दिली तरच या जखमी वाघावर उपचार करता येणार होते. शुक्रवारी दुपारी घटनास्थळावर मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, सहाय्यक उपवन संरक्षक आर. एम. वाकडे यांनी जखमी वाघाची पाहणी केली. मात्र रात्रीपर्यंत वाघाला ट्रॅक्युलायझेशन करण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळे चवथ्या दिवशीही या जखमी वाघावर उपचार करण्यात आले नाही. जखमी वाघाच्या सुरक्षेसाठी ४० कर्मचारी पहारा देत होते. गुरुवारी रात्री 12 वाजताच्या दरम्यान वाघ तलावात पाणी प्यायला. शुक्रवारपासून वाघ त्या ठिकाणाहून उठलाच नाही. त्याला घमेल्यात पाणी पाजावे लागले. वाघाची प्रकृती खालावत होती. मात्र पशु वैद्यकीय अधिकारी उपचार करू शकत नव्हते. कारण सुन्न करण्याचे इंजेक्शन देण्याची परवानगी नव्हती. परवानगी मिळाली तेव्हा वेळ हातून निघून गेली होती. खडसंगी येथे वाघाचे शवविच्छेदन करण्यात येत आहे.

टॅग्स :Tigerवाघ