शहरं
Join us  
Trending Stories
1
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
2
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
3
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
5
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
6
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...
7
म्युच्युअल फंडातील 'हे' शुल्क खातात तुमची कमाई; खर्च कमी करण्यासाठी काय करायचं?
8
देशातील परिस्थितीवर आलिया भटची इतक्या दिवसांनी पोस्ट; म्हणाली, "प्रत्येक वर्दीच्या मागे..."
9
२ दिवसापूर्वी कर्तव्यावर पोहचला जवान, आज पत्नीचं निधन; अवघ्या १५ दिवसाची लेक एकटी पडली
10
गुन्हेगार अन् पीडितला एकाच तराजूत तोलण्याचा प्रयत्न; ट्रम्प यांच्या भूमिकेवर शशी थरुर संतापले
11
कधीच न पाहिलेला फोटो शेअर करत दिग्दर्शकाची विराट कोहलीसाठी खास पोस्ट, म्हणाला...
12
धक्कादायक! विषारी दारू प्यायल्याने १४ लोकांचा मृत्यू, ६ जणांची प्रकृती चिंताजनक
13
ट्रम्प यांनी भारतावर लावला २५% टॅरिफ, आता प्रत्युत्तरात्मक शुल्काच्या तयारीत देश; पण 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले
14
उद्धव ठाकरेंच्या गोटात आणखी एक राजीनामा; तेजस्वी घोसाळकर, विनोद घोसाळकरांना मातोश्रीवर बोलावणे
15
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
16
₹३३,९२,९१,६०,००० चं गिफ्ट; डोनाल्ड ट्रम्प यांना मिळणारे सर्वात महागडं गिफ्ट; कोण करतंय इतका खर्च?
17
'मी पोलीस आहे, तुला सोडणार नाही'; कोल्हापुरात एसटी चालकाला मारहाण
18
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
19
'ही' प्रसिद्ध ऑटोकार कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार; काय आहे कारण?
20
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट

निराधार वर्षाचे एडीओंनी केले कन्यादान

By admin | Updated: January 20, 2016 02:20 IST

अकोल्यातील अधिका-याचे असेही दातृत्व; लोकमतने टाकला होता प्रकाशझोत

शिर्ला (पातूर, अकोला): देऊळगाव येथील एका निराधार मुलीचे कन्यादान अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी रविवारी केले. एका अधिकार्‍याच्या या दातृत्वामुळे समाजासमोर नवा आदर्श निर्माण झाला आहे. पातूर तालुक्यातील देऊळगाव हे गाव विदर्भातील शेतकरी आत्महत्याग्रस्त गाव म्हणून ओळखले जाते. याच गावात सुरेश उपर्वट हे मजुरी करून चार मुलांसह परिवाराचा गाडा ओढत होते. या दाम्पत्याला अवघ्या चाळीशीत विविध आजारांनी गाठले. अशातच पत्नीचा २0१२ साली, तर पुढच्याच वर्षी पतीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर वर्षा, मनीषा, निखिल, सुशील ही चौघेही भावंडे निराधार झाली. आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने समाजातील भीमराव उपर्वट यांनी पुढाकार घेत त्यांना शक्य तेवढी मदत केली. पशू उपचारानिमित्त गावोगावी फिरणार्‍या श्रीकांत समाधान बोरकर यांच्या लक्षात ही बाब आली आणि त्यांनीही मदतीसाठी पुढाकार घेतला. श्रीकांतच्या पाठपुराव्याने तहसीलदार राजेश वझिरे, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, ग्रामविकास अधिकारी राहुल उंद्रे यांनीही पुढाकार घेतला.ह्यलोकमतह्णमधील वृत्त वाचून मी या मुलांकडे तहसीलदार राजेश वझिरे यांच्यासमवेत गेलो. त्यांना आधार देण्याचा प्रयत्न केला. समाजानेही समोर येऊन अशी जबाबदारी पार पाडावी. आज वर्षाचे कन्यादान करताना डोळय़ात आनंदाश्रू आले असल्याचे मनोगत अकोल्याचे उपविभागीय अधिकारी - प्रा. संजय खडसे यांनी व्यक्त केले.उपर्वट कुटुंबातील मुलांच्या संघर्षगाथेवर नोव्हेंबर २0१४ मध्ये ह्यलोकमतह्णने प्रकाशझोत टाकला होता. त्यानंतर त्यांना मदतीचा ओघ सुरू झाला होता. तहसीलदारांनी या मुलांना अंत्योदय योजनेसह विविध योजनांचा लाभही मिळवून दिला.असा झाला आनंद सोहळावर्षाचा लग्नसोहळा अकोल्याच्या मनीषसोबत अकोल्यातील अशोक वाटिकेत रविवारी ११.३0 वाजता संपन्न झाला. वर्षाचे कन्यादान करण्यासाठी एसडीओ प्रा. संजय खडसे उपस्थित होते. त्यांनी लग्नासाठी आर्थिक मदतही दिली. पातूरचे तहसीलदार राजेश वझिरे, ग्रामविकास अधिकारी राहुल उंदरे, तलाठी चव्हाण आदींनीही या कार्यासाठी आर्थिक मदत दिली. यावेळी भीमराव उपर्वट, रामकृष्ण उपर्वट, बबलू तायडे, सुधाकर इंगळे, श्यामराव इंगळे, राजू सदार आदी उपस्थित होते.