शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडाच्या मुंबईतल्या घरांसाठी मे महिन्यात जाहिरात, जूनमध्ये सोडत

By admin | Updated: April 18, 2016 18:00 IST

म्हाडाच्या मुंबईतल्या घरांसाठीची लॉटरी यंदा गिरणी कामगारांच्या घरांच्या लॉटरीनंतर निघणार आहे, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष एस. एस. झेंडे यांनी दिली आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १८- म्हाडाच्या मुंबईतल्या घरांसाठीची लॉटरी यंदा गिरणी कामगारांच्या घरांच्या लॉटरीनंतर निघणार आहे, अशी माहिती म्हाडाचे उपाध्यक्ष एस. एस. झेंडे यांनी दिली आहे. त्यामुळे म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात म्हाडाच्या मुंबईच्या घरांसाठी लॉटरीची जाहिरात येणार असून, जूनच्या पहिल्या आठवड्यात सोडत निघणार आहे. मुंबईत सर्वसामान्यांसाठी यावेळी म्हाडा हजारो घरं लॉटरीच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहे. मात्र घरांची संख्या अद्यापही म्हाडाकडून जाहीर करण्यात आली नाही. मुंबई पश्चिम उपनगरातल्या गोरेगावमधल्या सिद्धार्थनगर 1 आणि 2 मधील घरांसाठी लॉटरी निघणार आहे. लॉटरीत मुलुंडमध्येही घरं उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. म्हाडाची गिरणी कामगारांसाठी असणारी घरांची लॉटरी येत्या एका महिन्यात निघणार आहे. 22 एप्रिलला म्हाडाच्या गिरणी कामगारांसाठी असलेल्या घरांची लॉटरी येणार आहे, अशी माहिती म्हाडाच्या उपाध्यक्षांनी दिली. मुंबईत 2 हजार 678 घरांची लॉटरी गिरणी कामगारांसाठी काढली जाणार असल्याची माहिती आता समोर येते आहे.