शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

‘एव्हीएम’मध्ये फेरफारसाठी दिलेला अ‍ॅडव्हान्स परत केला

By admin | Updated: March 4, 2017 05:30 IST

मतदान यंत्रामध्ये (एव्हीएम) फेरफार करुन देतो आणि तुमचे उमेदवार निवडून आणतो असे सांगणाऱ्याचे बिंग फोडण्यासाठी आपण त्याला अ‍ॅडव्हान्स दिला

अतुल कुलकर्णी,मुंबई- विदर्भातील एका शहरात मतदान यंत्रामध्ये (एव्हीएम) फेरफार करुन देतो आणि तुमचे उमेदवार निवडून आणतो असे सांगणाऱ्याचे बिंग फोडण्यासाठी आपण त्याला अ‍ॅडव्हान्स दिला; पण आम्ही दुसऱ्याची सुपारी घेतली आहे असे सांगत त्या व्यक्तीने दिलेले पैसे परत आणून दिले, अशी धक्कादायक माहिती एका ज्येष्ठ माजी मंत्र्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत दिल्याचे समजते.गेले काही दिवस राज्यात ‘एव्हीएम’ वरुन जोरदार चर्चा सुरु झाली आहे. काहीजण न्यायालयातही गेले आहेत. पिंपरी चिंचवड आणि पुण्यात राष्ट्रवादीला मिळालेले अपयश आणि काही हक्काच्या जागा पडल्यावरुन बैठकीत ही चर्चा सुरु झाली. पुण्यात संजय काकडे यांनी भाजपा ९२ जागा जिंकणार असे आदल्या दिवशी जाहीर केले आणि त्यांना नेमक्या तेवढ्याच जागा मिळाल्या. काकडे यांनी पुण्यातल्या राजकारणाचा एवढा अभ्यास कधी केला, असा तिरकस सवालही यावेळी एका नेत्याने उपस्थित केला. विदर्भात राष्ट्रवादीच्या एका माजी मंत्र्यांकडे तुम्ही सांगाल ते नगरसेवक आम्ही एव्हीएममध्ये फेरफार करुन निवडून आणू असे एकाने सांगितले. त्याचे बिंग फोडण्यासाठी म्हणून त्यांनी जेवढे पैसे मागितले ते मान्य करुन त्यापोटी काही रक्कम अ‍ॅडव्हान्सही दिली गेली, पण दोन तीन दिवसांनी तो माणूस परत आला व आम्ही इथे भाजपाचे काम घेतले आहे. तुमचे करता येणार नाही. येथे काँग्रेस, राष्ट्रवादीचे काम करायचे नाही अशा सूचना आहेत असे सांगून त्याने घेतलेला अ‍ॅडव्हान्स परत केला, असा दावाही त्या माजी मंत्र्याने बैठकीत केल्याचे समजते. त्यावर शरद पवार यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणावर यात काही होऊ शकते याविषयी आपल्या मनात शंका असल्याचे सांगितल्याचे एका नेत्याने सांगितले. २५ जिल्हा परिषदांमधील पक्षीय बलाबल पहाता सत्ता स्थापनेसाठी काय करायचे याचा आढावाही यावेळी घेतला गेला. जर राष्ट्रवादी आणि भाजपा अशी आघाडी झाली तर २५ पैकी १८ जिल्हा परिषदांमध्ये आपली सत्ता येऊ शकते अशी आकडेवारी बैठकीत दिली गेली. दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या तर आठ जागी सत्ता येऊ शकते अशी आकडेवारी यावेळी सांगण्यात आली. मात्र भाजपासोबत जायचे नाही अशी भूमिका खा. पवार यांनी मांडल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र, जिल्हापरिषदांसाठी कोणत्या पक्षासोबत जायचे याचे सगळे निर्णय स्थानिक पातळवरील राजकीय समिकरणे तपासूनच घेतले जावे, त्यासाठीचे सगळे अधिकार त्या त्या जिल्ह्याच्या नेत्यांना आणि ते जिल्हे ज्यांना निरीक्षक म्हणून दिले होते त्यांना विश्वासात घेऊन करावेत असेही या बैठकीत ठरल्याचे सांगण्यात आले. उद्या परत राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. परदेशी असल्यामुळे अजित पवार आजच्या बैठकीत उपस्थित नव्हते. दरम्यान, रात्री उशिरा दोन्ही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर झाली. त्या बैठकीस खा.अशोक चव्हाण, सुनील तटकरे, माणिकराव ठाकरे, मुंडे यांच्यासह राधाकृष्ण विखे पाटील, जयंत पाटील, नारायण राणे, दिलीप वळसे पाटील आदींची उपस्थिती होती व त्यात अधिवेशनातल्या फ्लोअर मॅनेजमेंट आणि जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर चर्चा झाली.