शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

गोदरेजने दिलेली पर्यायी जागा बुलेट ट्रेनसाठी योग्य, एनएचएसआरसीएलची उच्च न्यायालयात माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2018 01:32 IST

अहमदाबाद-मुंबई हाय स्पीड ट्रेन (बुलेट ट्रेन)साठी गोदरेज ग्रुपने सुचविलेली पर्यायी जागा प्रथमदर्शनी योग्य असल्याची माहिती दी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोेरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल)ने मंगळवारी उच्च न्यायालयाला दिली.

मुंबई : अहमदाबाद-मुंबई हाय स्पीड ट्रेन (बुलेट ट्रेन)साठी गोदरेज ग्रुपने सुचविलेली पर्यायी जागा प्रथमदर्शनी योग्य असल्याची माहिती दी नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोेरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल)ने मंगळवारी उच्च न्यायालयाला दिली.गोदरेज कंपनीचा विक्रोळी येथील भूखंड बुलेट ट्रेनसाठी संपादित करण्याचा प्रस्ताव प्राधिकरणाकडे होता. भूखंड संपादनाविरुद्ध गोदरेजने उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. नरेश पाटील व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. गेल्या सुनावणीत गोदरेजने प्राधिकरणाला पर्यायी जागा सुचविल्याचे न्यायालयाला सांगितले होते. मंगळवारच्या सुनावणीत या जागेच्या मालकी हक्कावरून राज्य सरकार व गोदरेजमध्ये वाद असून त्यासंबंधीच्या दाव्यावरील सुनावणी उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती गोदरेजने दिली. मात्र, आणखी पर्यायी जागा प्राधिकरणाला सुचविली असून त्यामुळे बुलेट ट्रेनच्या मार्गिकेत बदल होणार नाही, असे आश्वासनही दिले. त्यावर न्यायालयाने सरकारला गोदरेजने सुचविलेल्या पर्यायी जागेसंदर्भात मालकी हक्कावरून वाद नाहीत ना, याची माहिती काढण्यास सांगितले. तांत्रिक बाबींशिवाय पर्यावरणाचे नियम, खारफुटीचाही विचार करणे आवश्यक आहे, असे न्यायालयाने म्हटले.अंतिम निर्णयासाठी तीन सप्टेंबरपर्यंत मुदतअहमदाबाद-मुंबई या ५०८.१७ किलोमीटर ट्रॅकपैकी २१ किलोमीटर ट्रॅक भुयारी मार्गाने टाकण्यात येईल. हा भुयारी मार्ग विक्रोळी येथून जाणार आहे. त्यासाठी गोदरेजचा भूखंड संपादित करण्याचा प्राधिकरणाचा प्रस्ताव होता. मात्र, प्राधिकरणाने मंगळवारी न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, गोदरेजने सुचविलेला पर्यायी भूखंडही सकृतदर्शनी बुलेट ट्रेनसाठी योग्य आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय व्हायचा आहे. त्यावर न्यायालयाने प्राधिकरणाला त्यांचा अंतिम निर्णय ३ सप्टेंबरपर्यंत सांगण्याचे निर्देश दिले.

टॅग्स :Bullet Trainबुलेट ट्रेन