शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

राज्य कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रशासन सज्ज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2020 04:41 IST

राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली.

मुंबई : देशात कोरोनोचे रुग्ण सापडल्याने महाराष्ट्रानेही धास्ती घेतली असून सर्व पातळ्यांवर खबरदारीच्या उपाययोजना केल्या जात आहेत. सोलापुरात कोरोनोचा रुग्ण सापडल्याच्या चर्चेने गुरुवारी शहरात काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु तो रुग्ण न्युमोनियाचे असल्याचे नंतर स्पष्ट झाले. पुणे, मुंबई, नागपूरसारख्या महानगरांमधील आयटी वर्गाला काही अंशी घरातूनच काम करण्याची मुभा देण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी सर्व जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक घेतली. त्यामध्ये येथून पुढे आपण सर्वांनी गर्दी होणाऱ्या सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन टाळायला हवे, असे निर्देशही त्यांनी केले. त्यादृष्टीने राज्यातील महत्त्वाच्या यात्रा, उत्सवदेखील पुढे ढकलण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. पंढरपूर, तुळजापूर आदी प्रमुख तीर्थस्थानांवर सुविधा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रुग्णालयात भरती करण्यात आलेल्यांपैकी १८७ पैकी १७४ जणांचे नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन. आय. व्ही. पुणे यांनी दिला आहे. १२ जण मुंबईत, तिघे नाशिकमध्ये तर एक नांदेडमध्ये निरीक्षणाखाली आहेत.>मास्क कोणी वापरावा?सर्दी, खोकला असणारे रुग्ण.उपचारासाठी रुग्णालयात दाखल रुग्ण.रुग्णांच्या संपर्कात येणारे कुटुंबीय, नागरिक.डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचारी.रुग्णालयाच्या आवारातील नागरिक, व्यावसायिक.कोरोना विषाणूबाधित भागात प्रवास करणारे.रुमाल कोणी वापरावा?विविध कामानिमित्त घराबाहेर पडणारे सर्वसामान्य नागरिक.नोकरी, व्यवसायाच्या ठिकाणी काम करणारे नोकदार, व्यावसायिक.शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक.रेल्वे, बसमधून प्रवास करणारे.शिंकताना, खोकलताना रुमालाचा वापर.>मंत्रालयातील गर्दी टाळण्याच्या सूचनामंत्रालयात व अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू असल्यामुळे विधानभवनात गर्दी टाळा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती हाती आली आहे.मंत्रालयात प्रत्येक मंत्र्यांच्या दालनात प्रचंड गर्दी होत आहे. विधानभवनात देखील हीच अवस्था आहे. या दोन्ही ठिकाणी राज्यभरातील लोक येत असतात. त्यामुळे गर्दी टाळावी, अशा सूचना असल्याचे अधिकाºयांनी स्पष्ट केले. मंत्र्यांनी त्यांच्याकडे येणाºयांना शक्यतो आपापल्या मतदारसंघात भेटावे, त्यांना मंत्रालयात बोलावू नये. अनावश्यक गर्दी देखील टाळण्याचे सांगण्यात आले आहे.>‘एटीएम’ वापरल्यावर हात नक्की धुवानागपूर : पोलिसांनी ‘कोरोना’बाबत जनजागृतीसाठीदेखील पुढाकार घेतला आहे. जर ‘एटीएम’ वापरत असाल तर त्याचा ‘पिन’ तर कुणाला सांगू नकाच, शिवाय घरी जाऊन हात धुवा व ‘कोरोना’पासून बचाव करा, अशा आशयाचे ‘टिष्ट्वट’ फेसबुक पोस्ट पोलिसांनी केले असून त्याचा वेगाने प्रसार होत आहे.>सोलापुरात अफवा !सोलापूर : कोरोचा रुग्ण शहरात आढळल्याच्या अफवेमुळे भीती निर्माण झाली होती, मात्र त्याला न्यूमोनिया झाल्याचे रुग्णालयाने सांगितले. लोणावळा येथेही अफवा पसरली होती.>शरद पवार यांचा जळगाव दौरा रद्दजळगाव : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर दक्षता म्हणून शक्यतोवर गर्दी टाळावी, अशा प्रशासकीय सूचना असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ९ मार्च रोजीचा जळगाव जिल्हा दौरा रद्द करण्यात आला आहे़>पर्याय हातात ठेवावा लागेल- प्रदीप भार्गव‘कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे देशातील इलेक्ट्रॉनिक, आॅटोमोबाईल आणि रसायन उद्योग काहिसा प्रभावित झाला आहे. मात्र कोणत्याही कंपनीतील काम कच्च्या मालाअभावी ठप्प झालेले नाही. या साथीमुळे कोणत्याही एका देशावर अथवा पुरवठादारावर अवलंबून न राहण्याचा धडा मिळाला आहे. चीनमधे वुहान सोडल्यास इतर ठिकाणच्या कारखान्यातील उत्पादन सुरू झाले आहे. तसेच, तेथून काही जहाजे रवानादेखील झाली आहेत. दोन ते तीन आठवड्यांत माल येईल. इलेक्ट्रॉनिक, रसायने यातून विषाणूचा प्रसार होत नसल्याने तसा धोका नाही,’ असे मराठा चेंबर आॅफ कॉमर्स इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चरचे अध्यक्ष प्रदीप भार्गव यांनी सांगितले.>मास्क चांगला की,रु माल वापरावा?औरंगाबाद : कोरोना विषाणूमुळे सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. परिणामी, सर्वसामान्य नागरिकांकडून मास्कची मागणी वाढली आहे. मात्र, सर्वसामान्य नागरिकांनी मास्क वापरावा, एवढी गंभीर स्थितीअद्याप नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. मास्क म्हणून रुमालाचा वापरही केला जातो. मास्क वापरणेकेव्हाही चांगले. मात्र, स्वच्छरुमाल वापरला तरी विषाणूंपासून बचाव होऊ शकतो. मास्क आणि रुमाल वापराबाबत तज्ज्ञांनीदिलेली माहिती.>तुळजाभवानी मंदिरात सफाईच्या सूचनातुळजापूर (जि़उस्मानाबाद) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरातही खबरदारी घेतली जात आहे़ सध्या स्वच्छतेवर जास्त भर देण्यात आला असून, डिजीटल फलक तसेच मास्क वापराच्या अनुषंगाने हालचाली सुरु झाल्या आहेत़

टॅग्स :corona virusकोरोना