शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य पांचोलीला कारावास

By admin | Updated: November 6, 2016 02:14 IST

सतत वादाच्या भोवऱ्यात असलेल्या अभिनेता आदित्य पांचोलीला शेजाऱ्याला मारहाण करणे चांगलेच महागात पडले आहे. तब्बल ११ वर्षांनी केसचा निकाल देत अंधेरी

मुंबई : सतत वादाच्या भोवऱ्यात असलेल्या अभिनेता आदित्य पांचोलीला शेजाऱ्याला मारहाण करणे चांगलेच महागात पडले आहे. तब्बल ११ वर्षांनी केसचा निकाल देत अंधेरी दंडाधिकाऱ्यांनी आदित्य पांचोलीला एक वर्षाची कारवासाची शिक्षा व २० हजार रुपये दंड ठोठावला. मात्र आदित्य पांचोली दंडाधिकाऱ्यांच्या या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देणार असल्याने दंडाधिकाऱ्यांनी त्याची तातडीने जामिनावर सुटका केली. त्यामुळे त्याची जेलवारी टळली आहे.अंधेरीचे दंडाधिकारी अमिताभ पंचभाई यांनी आदित्य पांचोलीला एक वर्षाची शिक्षा व २० हजार रुपयांचा दंड ठोठावला. आदित्य पांचोली या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देणार असल्याने दंडाधिकाऱ्यांनी पांचोलीची १२ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका केली. आदित्यच्या म्हणण्यानुसार, तक्रारदार त्याच्या सोसायटीत भाड्याने राहात होता. त्यामुळे त्याच्याविषयी पांचोलीला काहीही माहीत नाही. एके दिवशी पांचोलीचा मित्र त्याला भेटायला आला. त्याला पार्किंगची एक जागा रिकामी दिसल्याने त्याने त्या ठिकाणी त्याची गाडी पार्क केली. थोड्या वेळाने तक्रारदार त्या ठिकाणी आला आणि त्याने त्याच ठिकाणी त्याची गाडी पार्क करून पांचोलीच्या गाडीचा रस्ता बंद केला. त्यामुळे त्याच्या मित्राची गाडी बाहेर येऊ शकत नव्हती. मित्राच्या मदतीसाठी पांचोली खाली धावत आला. बाचाबाची झाल्यावर तक्रारदाराने थेट त्याच्यावर मारहाणीचा आरोप केला. तक्रारदाराने पूर्ण विचार करूनच आपल्यावर गुन्हा नोंदवला. अन्यथा त्याने घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांत तक्रार केली नसती, असा युक्तिवाद आदित्यच्या वकिलांनी दंडाधिकाऱ्यांपुढे केला. तर तक्रारदाराने आदित्य पांचोलीने मारहाण केल्याचा दावा केला आहे. आदित्यने मारहाण केल्याने फ्रॅक्चर झाले तसेच नाकातून रक्तही आले. सर्व पुरावे ग्राह्य धरून दंडाधिकाऱ्यांनी पांचोलीला एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली. (प्रतिनिधी) मी दहशतवादी नाही - पांचोलीमी दहशतवादी कृत्यात सहभागी नाही किंवा कोणताही बॉम्बस्फोट केलेला नाही. त्यामुळे दंडाधिकाऱ्यांनी सुनावलेली शिक्षा कठोर आहे. मी या निर्णयाला सत्र न्यायालयात आव्हान देईन.आदित्य पांचोलीवर २०१३मध्येही त्याचे शेजारी भार्गव पटेल यांना मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पांचोलीने पटेललाही पार्किंग स्पेसवरूनच मारहाणर केली. तर गेल्याच वर्षी एका पब बाऊन्सरला मारहाण केल्याची केसही त्याच्यावर नोंदवण्यात आली आहे. आवडते गाणे न लावल्याने त्याने पब बाऊन्सरला मारले. त्यापूर्वी त्याला त्याच्या आधीच्या प्रेयसीवर बलात्कार केल्याप्रकरणीही शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तसेच अभिनेत्री पूजा बेदीच्या अल्पवयीन मोलकरणीवरही बलात्कार केल्याचा आरोप पांचोलीवर आहे.