शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य ठाकरेंसाठी खेळपट्टी तयार; उद्यापासून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 16:49 IST

या यात्रेत आदित्य लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानणार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी आशीर्वाद देण्याचे आवाहन करणार असल्याचे समजते.

मुंबई - भारतीय जनता पक्षासोबत सत्तेत असलेला शिवसेना पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रीपदासाठी आक्रमक आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार अशा ताकीद शिवसेना नेत्यांकडून देण्यात येत आहे. परंतु, शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तरी, त्यासाठी नाव कुणाचे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यातच आता उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी राज्यात जन आशीर्वाद यात्रा काढण्याचे निश्चित केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी आदित्य ठाकरे तर शर्यतीत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. आदित्य यांच्या जन आशीर्वाद यात्रेला उद्या गुरुवारपासून सुरूवात होणार आहे.

शिवसेनेचे राज्यातील संघटन आणखी मजबूत करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलने आणि संवाद यात्रांवर भर देण्यात येत आहे. त्यानुसार आदित्य ठाकरे महाराष्ट्रात जन आशीर्वाद यात्रा काढणार आहे. या यात्रेत आदित्य लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवारांना निवडून दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानणार आहेत. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी आशीर्वाद देण्याचे आवाहन करणार असल्याचे समजते.

आदित्य यांची जन आशीर्वाद यात्रा सहा टप्प्यांत पार पडणार आहे. या यात्रेचा पहिला टप्पा उद्या १८ जुलैपासून सुरू होणार आहे. या अंतर्गत ते जळगावमध्ये संवाद साधणार आहेत. या टप्प्यात, १९ जुलै धुळे, २० जुलै नाशिक शहर, २१ जुलै नाशिक ग्रामीण, नगर आणि २२ जुलै नगर, श्रीरामपूर आणि शिर्डी अशी असणार आहे.

या जन आशीर्वाद यात्रेतून आदित्य ठाकरे शिवसेनेचे आणि युवा सेनेचे राज्यातील संघटन आणखी मजबूत करणार आहेत. जेणे करून भविष्यातील सक्रिय राजकारणात त्यांना याचा लाभ घेता येईल. त्यासाठी शिवसैनिक देखील सरसावले असून अनेक शिवसैनिकांना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होताना पाहायची इच्छा आहे.