शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आदित्य विरुद्ध अमित!

By admin | Updated: August 13, 2015 02:51 IST

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा लवकरच अमित ठाकरे यांच्याशी राजकीय सामना होण्याची चिन्हे दिसत आहेत. मनसेमधील फेरबदलात आदित्य शिरोडकर यांना सरचिटणीसपदी बढती

मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा लवकरच अमित ठाकरे यांच्याशी राजकीय सामना होण्याची चिन्हे दिसत आहेत. मनसेमधील फेरबदलात आदित्य शिरोडकर यांना सरचिटणीसपदी बढती मिळाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण युवक सेनेचे नेतृत्व राज यांचे पुत्र अमित यांच्याकडे येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.उद्धव व राज ठाकरे हे दोन बंधू एकत्र येणार, अशा चर्चेला ऊत आला असतानाच अगोदर उद्धव यांनी व त्यानंतर राज यांनी या वावड्या असल्याचे स्पष्ट केल्याने येत्या मुंबई महापालिका निवडणुकीत या ठाकरे बंधूंचा सामना होणार हे स्पष्ट दिसत आहे. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठातील सिनेटच्या निवडणुकीपासून महापालिका निवडणुकीपर्यंत आदित्य व अमित या दोन ज्युनिअर ठाकरेंच्या नेतृत्वाखाली युवक सेनांचा सामनाही अटळ असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.आदित्य शिरोडकर हे मनसेच्या युवक सेनेचे प्रमुख होते. फेरबदलात त्यांना पक्षाचे सरचिटणीस केल्याने आता युवक सेनेचे अध्यक्षपद रिक्त झाले आहे. यापूर्वी प्रचाराच्या रोड शोमध्ये केवळ सामील झालेले व विधानसभा निवडणूक निकालानंतर मतदारसंघांत फिरून पराभवाची चाचपणी केलेले अमित ठाकरे हे लवकरच या पदाची सूत्रे स्वीकारतील.मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाचा कस लागेल. त्यानंतर कल्याण-डोंबिवली, मुंबई या महापालिकांत वडिलांच्या खांद्याला खांदा लावून ते प्रचार करतील. आदित्य हे अनेकदा टिष्ट्वटर व अन्य माध्यमातून विरोधकांचा समाचार घेत असतात. राज यांचा सामना उद्धव यांच्याशी असल्याने आदित्य यांचा सामना यापुढे अमित करतील. (विशेष प्रतिनिधी)मनसेत झाला फेरबदलमनसेच्या फेरबदलात ‘नेता’ हे नवे पद निर्माण केले गेले आहे. बाळा नांदगावकर, शिशिर शिंदे यांच्यासह अनेक नेत्यांना या पदावर नियुक्त करताना शिरीष पारकर यांचा नेत्यांच्या यादीत समावेश न झाल्याने सध्या काहीसे दूर असलेले पारकर मनसेपासून दुरावल्याची चर्चा आहे. शिल्पा सरपोतदार यांचाही या यादीत कुठेच समावेश नसल्याने तसेच त्यांचा पुत्र युवासेनेत दाखल झाल्याने त्यांनाही मनसेला सोडचिठ्ठी देण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे बोलले जात आहे.