विजय सरवदे, औरंगाबादशिक्षकांनी वर्गात तंबाखू, गुटखा, मावा किंवा पान खाल्ल्यास त्यांना नोकरीला मुकावे लागणार आहे. शिक्षण संचालनालयाने ४ जानेवारी २०१६ रोजी शिक्षण उपसंचालक कार्यालयास या आशयाचे परिपत्रक जारी केले आहे. शिक्षण उपसंचालक कार्यालयाने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांतील प्राथमिक विभागाच्या शिक्षकांना जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी शाळांवर नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.‘ओरिएंटल ह्युमन राइट्स प्रोटेक्शन फोरम’ या ठाण्याच्या स्वयंसेवी संस्थेने शिक्षण संचालकांकडे यासंबंधी तक्रार केली होती. शिक्षकच वर्गात तंबाखू, गुटखा, मावा किंवा पान खाऊन अध्यापन करत असतील, तर त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांवर होतो. त्यामुळे अशा शिक्षकांना तत्काळ प्रतिबंध करण्याच्या सूचना शिक्षण संचालनालयाने दिल्या आहेत. त्यानंतरही शिक्षकांनी आपल्या वर्तनात बदल केला नाही, तर सुरुवातीला त्यांची बढती थांबविणे, जिल्हा किंवा अन्य प्रकारचा पुरस्कारन देणे, तसेच शासनाच्या अन्यसुविधा थांबविण्याची कारवाई करण्यात येईल. त्यानंतरही जेशिक्षक सूचनांचे पालन करणार नाहीत, त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे.कडक कारवाई करणारशिक्षण उपसंचालक सुधाकर बानाटे म्हणाले की, शिक्षण संचालनालयाकडून व्यसनी शिक्षकांविरुद्ध कारवाई करण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. प्रामुख्याने ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षकांवर लक्ष ठेवण्याचे सूचित केले जाणार आहे. वर्गात शिकवत असताना तंबाखू किंवा व्यसने करणाऱ्या शिक्षकांवर कडक कारवाई करण्यात येईल.
व्यसनी गुरुजींची नोकरी आता येणार धोक्यात!
By admin | Updated: January 9, 2016 04:04 IST