शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
4
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
5
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
6
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
7
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
8
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
9
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
10
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
11
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
12
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
13
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
14
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
15
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
16
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
17
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
18
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
19
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
20
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!

औद्योगिक विकासासाठी यवतमाळ हवाई मार्गाने जोडा

By admin | Updated: December 30, 2014 00:52 IST

दळणवळणाच्या पुरेशा सोई उपलब्ध नसल्याने यवतमाळ जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही, असा ठोस निष्कर्ष डॉ. विजय केळकर समितीने काढला आहे. यवतमाळला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी

केळकर समितीची शिफारस : दळणवळणाच्या सोई-सुविधांचा अडसर, ब्रॉडगेज रेल्वे लाईनचाही प्रस्ताव राजेश निस्ताने - यवतमाळ दळणवळणाच्या पुरेशा सोई उपलब्ध नसल्याने यवतमाळ जिल्ह्याचा विकास होऊ शकला नाही, असा ठोस निष्कर्ष डॉ. विजय केळकर समितीने काढला आहे. यवतमाळला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी ब्रॉडगेज रेल्वे मार्ग, नियमित हवाई वाहतूक सुरू करण्याची शिफारसही या समितीने केली आहे. शासनाने महाराष्ट्राच्या समतोल प्रादेशिक विकासाच्या प्रश्नांवरील अभ्यासासाठी डॉ.विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली होती. या समितीमध्ये नऊ सदस्य आहेत. नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव के.बी. बक्षी समितीचे सदस्य सचिव आहेत. या समितीने आपला अहवाल नुकताच शासनाला सादर केला. हा अहवाल विधिमंडळाच्या पटलावरही ठेवला गेला. या अहवालात यवतमाळ जिल्ह्याच्या मागासलेपणाची कारणे आणि उपाययोजना यावर ऊहापोह केला गेला आहे. दळणवळणाच्या सोईसुविधांचा अभाव हे प्रमुख कारण डॉ. केळकर समितीने यवतमाळ जिल्ह्याच्या मागासलेपणासाठी नमूद केले आहे. रस्ते मार्ग, रेल्वे मार्ग आणि हवाई मार्ग विकसित करण्यावर भर देण्याचे त्यांनी सुचविले आहे. यवतमाळात स्वातंत्र्य संग्राम सेनानी जवाहरलाल दर्डा विमानतळ आहे. तेथील धावपट्टीचा आणखी विस्तार करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणासाठी त्याचा वापर करावा, आमदारांनी सरकारवर दबाव वाढवावा शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्हा विकासात माघारला आहे. जिल्ह्याला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी दळणवळणाच्या पुरेशा सोई आवश्यक आहे. त्यांच्या कमतरतेवर डॉ. विजय केळकर समितीने शिक्कामोर्तब करताना उपाययोजनाही सूचविल्या आहेत. केळकर समितीचा हा अहवाल जिल्ह्यातील आमदार-खासदारांना विकासासाठीच्या लढाईत ‘अस्त्र’ म्हणून उपयोगी पडणारा आहे. विकासाच्या मुद्यावर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षभेद विसरुन एकत्र येणे व त्यातूनच केंद्र व राज्यातील सरकारवर दबाव निर्माण करणे अपेक्षित आहे. केळकर समितीच्या शिफारशींचा पाठपुरावा करण्यासोबतच लोकप्रतिनिधींनी आता वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्गाला गती देण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नागपूर-बोरी-तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग घोषित झाला आहे. त्याचे काम वेगाने व्हावे म्हणून आमदारांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची अपेक्षा जिल्हाभरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.