शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

रोगमुक्तीसाठी अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीचा मोठा वाटा, ९० हून अधिक डॉक्टर्सचा सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 02:52 IST

लोकांना रोगमुक्त करण्यासाठी अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीचा मोठा वाटा आहे. ही पद्धत घराघरांत पोहोचविण्याचा विडा आता अ‍ॅक्युपंक्चर थेरपीतील तज्ज्ञांनी उचलला आहे. त्यासाठीच इंडियन इंटेग्रेटेड अ‍ॅक्युपंक्चर असोसिएशनतर्फे ‘नॅशनल सेमिनार आॅन अ‍ॅक्युपंक्चर २०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. अंधेरी पश्चिमेकडील मेयर सभागृहात हे चर्चासत्र पाच दिवस सुरू राहणार आहे.

मुंबई : लोकांना रोगमुक्त करण्यासाठी अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीचा मोठा वाटा आहे. ही पद्धत घराघरांत पोहोचविण्याचा विडा आता अ‍ॅक्युपंक्चर थेरपीतील तज्ज्ञांनी उचलला आहे. त्यासाठीच इंडियन इंटेग्रेटेड अ‍ॅक्युपंक्चर असोसिएशनतर्फे ‘नॅशनल सेमिनार आॅन अ‍ॅक्युपंक्चर २०१७’चे आयोजन करण्यात आले आहे. अंधेरी पश्चिमेकडील मेयर सभागृहात हे चर्चासत्र पाच दिवस सुरू राहणार आहे.या चर्चासत्राचे उद्घाटन चीनचे मुंबईतील उपउच्चायुक्त ली युआनलिंग यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे डॉ. यास्मिन बेरामजी, आयोजक सचिव डॉ. एल. एन. कोठारी यांची प्रमुख उपस्थिती होती. अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा पद्धतीला लोकप्रिय करण्यासाठी या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. या राष्ट्रीय चर्चासत्रात देशभरातील तब्बल ९०हून अधिक तज्ज्ञ चिकित्सक अ‍ॅक्युपंक्चर चिकित्साचे पद्धतीवर चर्चा करणार आहेत. या पाच दिवसीय सेमिनारमध्ये चिकित्सकांना अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सेतील नव्या वाटा, त्यांना लागलेले नवे शोध यावर सखोल चर्चा होणार आहे. रुग्णांवर अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सा करून त्यांना रोगमुक्त कसे करावे, यावरही प्रामुख्याने चर्चा होणार आहे. अ‍ॅक्युपंक्चरद्वारे कशा प्रकारे चिकित्सा केली जाते, केली जाऊ शकते, याचेदेखील प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सर्वसामान्य जनतेला मोफत उपचार मिळावेत आणि रोगांपासून त्यांना मुक्ती मिळावी, यासाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे डॉ. एल. एन. कोठारी यांनी या वेळी सांगितले.अ‍ॅक्युपंक्चर ही मूळची चायनिज चिकित्सा पद्धती आहे. चीनमध्ये जाऊन अ‍ॅक्युपंक्चरचे शिक्षण कसे घेता येऊ शकते, याबाबत चीनचे उपउच्चायुक्त ली युआनलिंग यांनी चर्चासत्रात मार्गदर्शन केले. डॉ. एल. एन. कोठारी लिखित क्लिनिकल अ‍ॅक्युपंक्चर पुस्तक उपस्थितींना या वेळी देण्यात आले. पाच दिवस चालणाºया या चर्चासत्रात चिकित्सक डॉक्टरांना अ‍ॅक्युपंक्चर चिकित्सेबद्दलची इत्यंभूत माहिती देण्यासाठी, किरण फाळके आणि डॉ. मयंक शाह हेदेखील उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :doctorडॉक्टर