शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

कोपरखैरणेतील अतिक्रमणांवर कारवाई

By admin | Updated: June 9, 2017 02:38 IST

महापालिकेच्या माध्यमातून कोपरखैरणे सेक्टर ९ येथील अतिक्रमणांवर गुरुवारी कारवाई करण्यात आली

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महापालिकेच्या माध्यमातून कोपरखैरणे सेक्टर ९ येथील अतिक्रमणांवर गुरुवारी कारवाई करण्यात आली. सिडकोच्या संयुक्त सहकार्याने राबविण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत जवळपास ७५00 चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड अतिक्रमणमुक्त करण्यात आला.बुधवारी सिडकोच्या वतीने याच परिसरात धडक मोहीम राबवून जवळपास पाचशे कोटी रुपये किमतीचा भूखंड मोकळा करण्यात आला होता. अतिक्रमणमुक्त झालेल्या भूखंडाला कुंपण घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तर याच परिसरात ७५00 चौरस मीटर क्षेत्रफळावर पसरलेल्या अतिक्रमणावर बुधवारी महापालिका आणि सिडकोने संयुक्त कारवाई केली. याअंतर्गत व्यावसायिक गाळे, गोडाऊन, फर्निचरची दुकाने व काही झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. दरम्यान, दोन दिवसांत अतिक्रमणमुक्त झालेल्या या भूखंडांची निविदा काढून विक्री करण्यात येणार आहे. त्यासाठी सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागात स्वतंत्र मार्केटिंग सेल तयार करण्यात आला आहे. या सेलच्या माध्यमातून मोकळे झालेले भूखंड निविदा काढून विकले जाणार आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त अमरीश पटनिगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. यावेळी महापालिकेच्या कोपरखैरणे विभाग प्रमुख अशोक मढवी, सिडकोचे अनधिकृत बांधकाम नियंत्रक पी.पी. राजपूत, सहायक नियंत्रक गणेश झिने आदी उपस्थित होते. या मोहिमेसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.