शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

.तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई

By admin | Updated: August 6, 2016 01:48 IST

जात वैधता प्रमाणपत्राच्या मुद्यावर शासन गंभीर.

अकोला, दि. ५: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका राखीव प्रवर्गातून लढणार्‍या उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र नामनिर्देशनाच्यावेळी निवडणूक विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे; मात्र जात वैधता प्रमाणपत्र विहीत वेळेत उपलब्ध होत नसल्याची सबब पुढे करून उमेदवार प्रमाणपत्र सादर करण्यास चालढकल करतात. यापुढे हा प्रकार चालणार नसून, राखीव प्रवर्गातून निवडणूक लढणार्‍या उमेदवारांना अपात्र करण्याचे निर्देश शासनाने जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. आगामी दिवसांत राज्यातील २९८ नगरपालिकांसह दहा महापालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू होणार आहे. नोव्हेंबरच्या दरम्यान नगरपालिका तसेच फेब्रुवारी २0१७ मध्ये महापालिकांच्या निवडणुका होतील. स्वायत्त संस्थांच्या निवडणुकीत राखीव प्रवर्गातून लढणार्‍या उमेदवारांसाठी जात वैधता प्रमाणपत्र उमेदवारी अर्ज सादर करताना निवडणूक विभागाकडे सादर करणे बंधनकारक आहे; परंतु जात पडताळणी समितीकडून वेळेवर प्रमाणपत्र उपलब्ध होत नसल्याची सबब पुढे केली जाते. जात पडताळणी समित्यांवरील अतिरिक्त ताण व राखीव प्रवर्गातून निवडणूक लढणारे उमेदवार निवडणुकीपासून वंचित राहू नये म्हणून शासनाने वेळोवेळी संबंधित उमेदवारांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत दिली. त्यानंतरही मात्र सुधारणा होत नसल्याने संबंधित उमेदवारांविरोधात तक्रारींची संख्या वाढली. ही परिस्थिती लक्षात घेता ३१ डिसेंबर २0१६ पर्यंंत होणार्‍या स्वायत्त संस्थांच्या निवडणुकीमध्ये राखीव प्रवर्गातून लढणार्‍या उमेदवारांना प्रमाणपत्राच्या मुद्यावर अखेरची मुदतवाढ देण्यात आली असून, त्यानंतर मात्र थेट अपात्रतेची कारवाई करण्याचे निर्देश ग्राम विकास विभागाने जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत.तक्रारींची संख्या वाढली!विहीत मुदतीत अनेक उमेदवार जात वैधता प्रमाणपत्र सादर करू शकत नाहीत. अशावेळी त्यांच्या विरोधात निवडणूक विभागाकडे तक्रारी करण्याचे प्रमाण वाढले आहे. संबंधित उमेदवारही जात पडताळणी समितीच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदवत न्यायालयात धाव घेतात. एकूणच, शासनाकडे तक्रारींचा खच साचत असून, प्रशासकीय कामावर नाहक अतिरिक्त ताण पडत आहे.