मुंबई : कॅम्पा कोला इमारतीबाबत नियमानुसारच कार्यवाही केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले. न्यायालयाच्या आजच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, कॅम्पा कोला जमीनदोस्त करण्याची कार्यवाही सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत थांबविली होती आणि नियमात बसेल त्यानुसार राज्य सरकारने पावले उचलावीत, असे सूचित केले होते. त्यानुसार सहकार्य करण्याची शासनाची तयारी आहे. मात्र, राज्यातील अनधिकृत बांधकामे सरसकट नियमित करण्याचे कोणतेही धोरण नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. भिवंडीची ती गोदामेनियमित करणार भिवंडी परिसात असलेले अनेक अनधिकृत गोदामे नियमित करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, २२०० एकर जागेवर लॉजिस्टिक पार्कची उभारणी या ठिकाणी केली जाणार आहे. त्यात विविध सुविधा असतील. आता असलेल्या गोदामांची सुरक्षितता, मोकळी जागा सोडणे, गोदामासाठी जागेची मर्यादा निश्चित करणे आदी उपाययोजना करण्यात येतील. (विशेष प्रतिनिधी)
कॅम्पा कोलाबाबत नियमानुसारच कार्यवाही
By admin | Updated: January 31, 2015 05:29 IST