शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

संपकरी कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घ्यावी; उच्च न्यायालयाचे एसटी महामंडळाला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2022 08:03 IST

माणूस ज्या दुर्बलतेतून जातो, त्यातून विवाद व मतभेदांना जन्म होतो आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले.

मुंबई :

माणूस ज्या दुर्बलतेतून जातो, त्यातून विवाद व मतभेदांना जन्म होतो आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाते, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले. एसटी महामंडळ त्यांना शिस्तभंगाच्या कारवाईची भीती न दाखवता सेवेत रुजू करून घेईल. तसेच याआधी कारवाई करण्यात आली असेल तर ती मागे घ्यावी, असे आदेश उच्च न्यायालयाने महामंडळाला दिले. 

ज्या संपकरी कर्मचाऱ्यांना संपावर असताना त्यांची सेवा समाप्त का करू नये, अशी कारणे-दाखवा नोटीस बजावली आहे आणि ते कर्मचारी २२ एप्रिलपर्यंत सेवेत रुजू झाले तर त्यांच्या कारणे दाखवा नोटिसाही रद्द करण्यात येतील. तसेच काही कर्मचाऱ्यांच्या बदलीची किंवा निलंबनाची कारवाई करण्यात आली असेल तर तीही मागे घेण्यात येईल. मात्र, त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू व्हावे लाल.

न्यायालयाने हे आदेश मार्चमध्ये एमएसआरटीसीने  काढलेल्या परिपत्रकावरून दिले. ‘...आणि यामध्ये मानवतावादी विचारांचा समावेश आहे. सदर प्रकरणातील विचित्र परिस्थिती आणि तथ्ये पाहून हा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे हा आदेश मापदंड म्हणून मानला जाऊ नये, असेही मुख्य न्या. दीपांकर दत्ता व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने २६ पानी आदेशात स्पष्ट केले आहे.

हा आदेश कर्मचाऱ्यांचे हित विचारात घेऊन देण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांनी उपरोक्त आदेशांचे पालन करावे, अशी आमची अपेक्षा आहे. या आदेशांचे पालन करण्यात आले नाही तर महामंडळ कायद्यानुसार कारवाई करू शकते, असे न्यायालयाने एसटी संपासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिका निकाली काढताना स्पष्ट केले. ‘कर्मचाऱ्यांविरोधात करण्यात आलेली फौजदारी कारवाई महामंडळ पुढे नेणार नाही, असा विश्वास आणि आशा  आम्ही बाळगतो,’ असे न्यायालयाने म्हटले.

उच्च न्यायालयाचे कर्मचाऱ्यांसाठी दिलेले आदेश- तात्पुरत्या स्वरूपाच्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले असेल तर त्यांनाही महामंडळात पुन्हा रुजू होता येईल आणि जे कोरोनाच्या काळात कर्तव्यात होते, त्यांना नियमाप्रमाणे ३०० रुपये भत्ता म्हणून महामंडळाला द्यावा लागेल.- निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांबाबत न्यायालयाने म्हटले की, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अधिनियम १९५२ अंतर्गत असलेल्या योजनेद्वारे निर्धारित वेळेत भविष्य निर्वाह निधीच्या थकबाकीसाठी नियोक्त्याचा वाटा भविष्य निर्वाह निधी विभागाकडे जमा केला जाईल, अशी अपेक्षा आहे. तर भविष्य निर्वाह निधी विभाग विलंब न करता ती रक्कम निवृत्त कर्मचाऱ्याला देईल. जर कोणी अर्ज केला असेल तर भविष्य निर्वाह निधी विभाग एका महिन्यात त्या अर्जावर निर्णय घेईल. - कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोणी नुकसानभरपाईसाठी अर्ज केला असेल तर महामंडळाने एका महिन्यात त्यावर निर्णय घ्यावा, असेही स्पष्ट केले.

टॅग्स :ST Strikeएसटी संपHigh Courtउच्च न्यायालय