शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बोगस देशी दारू, ताडी, निरा उत्पादनाविरुद्ध कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2020 02:05 IST

‘एफडीए’ची राज्यातील पहिलीच मोहीम

-  अतुल कुलकर्णी मुंबई : अत्यंत घाणेरड्या वातावरणात, स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवून बनविण्यात येत असलेली देशी दारू, ताडी, माडी आणि नीरा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या छाप्यात सापडली. ३१ डिसेंबरच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर बोगस दारू विकली जाणार असल्याची खबर मिळताच एफडीए, एक्साईज आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने संयुक्त मोहीम हाती घेण्यात आली आहे. अशा प्रकारची राज्यातील ही पहिलीच मोहीम आहे.एफडीएने नाशिकमध्ये टँगो देशी दारूच्या कारखान्यावर छापा मारला. संत्रा, फाईन टँगो पंच, टँगो प्रीमियर आदी आढळून आले.  अन्नपदार्थांच्या लेबलवर मात्र ‘ऊस मळीच्या मद्यार्कात कृत्रिम स्वाद घालून तयार केलेली’ असे उल्लेख होते. त्यावर केवळ ‘रेक्टिफाईड स्पिरिट’ एवढाच उल्लेख होता. ऊस मळीपासून तयार करण्यात आल्याबद्दलचा कोणताही उल्लेख तेथे नव्हता. शिवाय या तपासणीत असंख्य घातक पदार्थही आढळून आले. वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा दर्जा अत्यंत निकृष्ट होता. त्याची तपासणी होत नव्हती. अशा असंख्य गोष्टी तेथे होत्या. त्यानंतर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी असे छापे मारण्यात आले. ज्यात कोल्हापूर, रायगड, मुंबई, औरंगाबाद, नागपूर अशा विविध शहरांचा समावेश आहे.भेसळीविरोधात मोहीम सुरुवातीच्या काळात काही कारखान्यांचे दारूचे उत्पादन एफडीएने थांबविले. मात्र उत्पादन थांबविणे हा उपाय नाही. भेसळयुक्त दारू बनविणे आणि विकली जाऊ नये, यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. एफडीए, एक्साईजकडून संयुक्तपणे तपासणीफूड सेफ्टी ॲण्ड स्टॅण्डर्ड ॲक्ट २००६ नुसार ‘अल्कोहोलिक ड्रिंक’चा समावेश ‘अन्न’ या घटकात करण्यात आला आहे.  योग्य त्या प्रमाणात अल्कोहोलचे मिश्रण होते की नाही हेदेखील तपासण्याचे अधिकार एफडीएला दिले आहेत. एफडीए, एक्साईज आणि जिल्हाधिकारी यांच्या विद्यमाने राबवली जात आहे. ही माहिती एफडीए आयुक्त अभिमन्यू काळे यांनी ‘लोकमत’ला दिली. राज्याचा महसूल बुडू नये म्हणून दक्षता अल्कोहोलचे प्रमाण किती आहे यानुसार एक्साईज लावण्याचे काम केले जाते. अल्कोहोलचे प्रमाण तपासण्याचे काम एफडीएचे आहे.   त्यानुसारच ही कारवाई करण्यात आल्याचे सांगून काळे म्हणाले, बोगस दारू बनविणे आणि विकणे यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होतो. ‘बोगस दारूचे बळी’ अशा बातम्या येतात. दुसरीकडे राज्याचा महसूल बुडतो. हे होऊ नये यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे.

टॅग्स :FDAएफडीए