शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

चेन्नई एक्स्प्रेसमधून सोने ताब्यात

By admin | Updated: January 28, 2017 01:56 IST

प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या तपासणीमध्ये चेन्नईहून मुंबईला नेण्यात येत असलेले तब्बल अडीच कोटींचे साडेआठ किलो सोने

पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने रेल्वे स्थानकावर सुरू असलेल्या तपासणीमध्ये चेन्नईहून मुंबईला नेण्यात येत असलेले तब्बल अडीच कोटींचे साडेआठ किलो सोने लोहमार्ग पोलिसांनी जप्त केले आहे. पुणे रेल्वे स्थानकावर शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली असून, याबाबत प्राप्तिकर विभागाला कळवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सातव यांनी दिली. गोविंद प्रेमाराम प्रजापती (वय ३५, रा. अभयानगर, काळाचौकी, मुंबई), विपुल जेठमल रावल (वय १९, रा. तखतगड, जि. पाली, राजस्थान), प्रतापसिंग कालुसिंग राव (वय २७, रा. बेयणा, ता. मावली, जि. उदयपूर, राजस्थान) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. निरीक्षक सातव यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत यांनी प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने रेल्वे स्थानकांवर घातपातविरोधी तपासणी कडक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, लोहमार्ग पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची तपासणी करीत होते. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास सहायक फौजदार बाबासाहेब ओंबासे, संतोष लाखे, भीमाशंकर बमनाळीकर, मिलिंद आळंदे, गणेश शिंदे, अशोक गायकवाड, अमरदीप साळुंके, कैलास जाधव हे फलाटावर गस्त घालीत होते, त्या वेळी फलाट क्रमांक एकवर चेन्नई एक्स्प्रेस उभी होती. गाडीच्या क्रमांक एकच्या बोगीमध्ये १७ व १८ क्रमांकाच्या सीटवर तीन जण संशयास्पद अवस्थेत बसलेले आढळून आले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांशी वाद घालायला सुरुवात केली. त्यांच्याबाबत संशय अधिकच बळावल्याने पोलीस पथक त्यांच्यासोबत खडकी स्थानकापर्यंत गेले. त्यांच्याजवळील बॅगेमध्ये दोन प्लॅस्टिक बॉक्समध्ये जड वस्तू असल्याचे लक्षात येताच त्यांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पंचांसमक्ष बॉक्स उघडले असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बांगड्या आणि सोन्याचे दागिने तसेच २४ कॅरेटच्या सोन्याचे पत्र्याच्या पट्ट्या मिळून आल्या. या सर्व ऐवजाचे वजन साडेआठ किलो असून २ कोटी ४९ लाख १७ हजार ५८८ रुपयांचा हा ऐवज जप्त करण्यात आला आहे. याबाबत प्राप्तिकर विभागाला माहिती कळवण्यात आली असून, या तिघांना त्यांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. ही कारवाई अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत, उपविभागीय अधिकारी प्रफुल्ल क्षीरसागर, वरिष्ठ निरीक्षक संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.