शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

नवी मुंबई शहरात ध्वनिप्रदूषण वाढले

By admin | Updated: September 1, 2014 22:44 IST

वाहनांची वाढती संख्या व औद्योगिकीकरणामुळे शहरात ध्वनिप्रदूषण वाढत आहे.

नामदेव मोरे,
नवी मुंबई : वाहनांची वाढती संख्या व औद्योगिकीकरणामुळे शहरात ध्वनिप्रदूषण वाढत आहे. शांतता क्षेत्रमध्येही ध्वनीची पातळी सरासरीपेक्षा जास्त असल्याचे महापालिकेच्या अहवालावरून स्पष्ट झाले असून याविषयी योग्य उपाययोजना न झाल्यास नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 
नवी मुंबईमध्ये हवेतील प्रदूषण कमी होत असले तरी ध्वनिप्रदूषणाचे प्रमाण कमी झालेले नाही. सायन - पनवेल महामार्ग, ठाणो - बेलापूर, पामबीच रोड या प्रमुख रस्त्यांसह शहरातील अंतर्गत रोडवरही वाहनांची वर्दळ वाढली आहे. औद्योगिक वसाहत, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर उद्योग वाढत असल्यामुळेही शहरातील वाहनांची संख्या वाढली आहे. या सर्वामुळे ध्वनिप्रदूषण मोठय़ाप्रमाणात वाढत आहे. निवासी क्षेत्रमध्ये दिवसा 55 व रात्री 45 डेसिबल एवढी ध्वनीची पातळी अपेक्षित असते. परंतु शहरात बहुतांश सर्व ठिकाणी यापेक्षा जास्त डेसिबल  आवाजाची नोंद झाली आहे. वाशीमध्ये 5क्.5क् ते 65.5क् एवढी सर्वाधिक नोंद झाली आहे. व्यावसायीक परिसरात दिघ्यामध्ये 58 ते 75.3 एवढी नोंद झाली आहे. 
शहरातील प्रमुख चौक, सिगAल व इतर ठिकाणी गोंगाट असह्य होवू लागला आहे. वाहनधारक विनाकारण हॉर्न वाजवितात. बांधकाम क्षेत्र, ध्वनिक्षेपक व इतर कारणांमुळेही प्रदूषण वाढत आहे. ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. 
वाढत चाललेया या आवाजांमुळे ज्येष्ठ नागरिकांना कानाचे विकार, झोप न लागणो, चिडचिडेपणा व इतर आजार याव्यतिरिक्त लहानग्यांनाविविध आजार होण्याची भीती व्यक्त केली आहे. महापालिका व वाहतूक पोलिसांनी प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी केली जात आहे. 
 
निवासी क्षेत्रतील ध्वनिप्रदूषणाची सद्यस्थिती 
विभागदिवसारात्री
बेलापूर6क्46
नेरूळ5946.5
वाशी पंप हाऊस62.547. 3
जुईनगर6349.5
व्यावसायिक विभागातील आवाजाची स्थिती 
बेलापूर69.556
दिघा75.366.1
कोपरखैरणो68.553.3
वाहतूक जास्त असलेली ठिकाणो
महापे ब्रीज 73.358
रबाळे पंप हाऊस76.858.8
तुर्भे7क्.554
वाशी वॉर्ड ऑफिस7क्.554
 
शांतता क्षेत्रे उरली नावापुरती
महानगरपालिका क्षेत्रमध्ये 25 ठिकाणी शांतता क्षेत्रे घोषित केली आहेत. यामध्ये रूग्णालय, शाळा,महाविद्यालय परिसरांचा समावेश आहे. या परिसरामध्ये दिवसा 5क् व रात्री 4क् डेसिबल एवढी ध्वनीची पातळी असली पाहिजे. परंतु शहरातील सर्वच शांतता क्षेत्रमध्ये किमान 44 ते कमाल 61 डेसिबल एवढा गोंगाट असल्याचे निदर्शनास आले आहे. वाशीतील लक्षद्विप रूग्णालयाजवळ सर्वाधिक 48 ते 61 डेसिबल एवढे प्रमाण असल्याचे निदर्शनास आले असून शांतता क्षेत्रचे गोंगाट क्षेत्र झाले आहे.