शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

नऊ गावांनी उभारली अखंड श्रमदानाची गुढी

By admin | Updated: March 28, 2017 20:26 IST

ऑनलाइन लोकमत अकोला, दि. 28 : दुष्काळातून कायमचे मुक्त होण्यासाठी मराठी नवीन वर्षानिमित्त पाणीदार करण्यासाठी पातूर तालुक्यातील नऊ ...

ऑनलाइन लोकमत

अकोला, दि. 28 : दुष्काळातून कायमचे मुक्त होण्यासाठी मराठी नवीन वर्षानिमित्त पाणीदार करण्यासाठी पातूर तालुक्यातील नऊ गावांनी अखंड श्रमदान करण्याची सामूहिक गुढी उभारली. शिर्ला येथे सरपंच रिना संजय शिरसाट यांच्या हस्ते गुढी उभारून पाण्यासाठी अभिनव संकल्प करण्यात आला.शिर्ला गावाच्या मुख्य चौकात आज सकाळी ९ वाजता जलसैनिक गावकऱ्यांच्या उपस्थितीत संकल्प गुढी उभारली. ह्यदुष्काळाशी दोन हात, दुष्काळावर करू कायमची मात अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. शिर्ला गावात गतवर्षी सुवर्ण नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाच्या माध्यमातून केलेली जलसंधारणाची विविध कामे, त्यामुळे बदलत चाललेले शेतकरी जीवन आणि यावर्षी प्रस्तावित कामाची माहिती सरपंच रिना शिरसाट यांनी दिली. यावेळी कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते संजय शिरसाट, ग्रा.पं. सदस्य सुनील अंधारे, प्रकाश उगले, जलसैनिक इम्रान खान, हरीश कोकाटे, स्वप्निल मुळे, राजेश, प्रवीण इंगळे, रघुनाथ बोचरे, गजानन गवरे, रामकृ ष्ण खंडारे, प्रकाश इंगळे, जगन्नाथ राऊत, संजय खाडे, देवीदास बळकार, गजानन बळकार, संजय गिऱ्हे, संजय इंगळे, सचिन इंगळे, शंकर लांडे, लता अंधारे, दत्तात्रय निलखन, डिगांबर उगले, राऊत, ज्ञानदेव हिरळकार आदी उपस्थित होते. यावेळी श्रमदानातून गावाला दुष्काळमुक्त करण्याची शपथ गावकऱ्यांनी घेतली. संचालन, प्रास्ताविक संतोषकुमार गवई यांनी केले.

सामूहिक गुढी उभारून केला संकल्पपातूर तालुक्यातील शिर्ला, चिचखेड, चारमोळी, भंडारज, तांदळी, बेलुरा, अंधारसांगवी, शेकापूर, मळसूर आदी गावांमध्ये गुढीपाडव्यानिमित्त पाणी फाउंडेशनची सामूहिक गुढी उभारून ग्रामस्थांनी अखंड श्रमदान करण्याचा संकल्प केला. चारमोळी या गावात सामूहिकपणे उभारलेल्या गुढीची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत गावातील सर्वच ग्रामस्थ सहभागी झाले होते. चारमोळी या गावात नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तब्बल १० खड्डे खोदून श्रमदान करण्याचा संकल्प करण्यात आला. पाणी फाउंडेशनच्या वाटर कपमुळे आमचे चारमोळी गाव एकत्र आले आहे. आजपर्यंत गावात सामूहिकपणे गुढी कधीही उभारली गेली नव्हती; परंतु वॉटर कपच्या माध्यमातून श्रमदानामुळे सर्व गाव एकत्र आले आहे.भीमाबाई हजारे, चारमोळी

https://www.dailymotion.com/video/x844utu