शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

आरोप करणाऱ्यांनी सिद्ध करावेत

By admin | Updated: March 1, 2017 01:16 IST

निवडणूक यंत्रणेचे सर्व कामकाज पारदर्शीच होते व आहे. पराभूत उमेदवारच मतदान यंत्राबाबत तक्रार व तीसुद्धा निवडणूक निकालानंतर करीत आहेत.

पुणे : निवडणूक यंत्रणेचे सर्व कामकाज पारदर्शीच होते व आहे. पराभूत उमेदवारच मतदान यंत्राबाबत तक्रार व तीसुद्धा निवडणूक निकालानंतर करीत आहेत. आरोप करणारांनी ते सिद्ध करावेत. येत्या दोन दिवसांत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मतदानाची अंतिम आकडेवारी टाकली जाईल, असे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी सांगितले.मतदान यंत्रावर होत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी संवाद साधताना कुणाल कुमार यांनी सर्व आरोप खोडून काढले व प्रशासनाचे कामकाज पारदर्शीच असल्याचा दावा केला. मतमोजणीनंतर लगेचच जाहीर करण्यात आलेली आकडेवारी अंतिम नव्हती. महापालिकेच्या संकेतस्थळावर टाकलेली आकडेवारीही फक्त माहितीकरता म्हणून जाहीर करण्यात आली होती. आयोगाच्या संकेतस्थळावर येत्या दोन दिवसात अंतिम आकडेवारी जाहीर केली जाईल, असे कुणाल कुमार म्हणाले.आरोपाविषयी बोलताना त्यांनी पराभूतांकडूनच तक्रारी केल्या जात आहेत, याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले, मतदानाच्या आधी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या समोर मॉक पोल म्हणजे मतदानाची रंगीत तालीम घेतली जाते. त्यावेळी, नंतर प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडताना, मतदान यंत्रे सील केली जाताना, ती स्ट्रॉँग रूममध्ये एक दिवस बंदिस्त असताना कोणीही तक्रार केली नाही. मतमोजणी सुरू असतानाही कोणाची तक्रार नव्हती. निकाल जाहीर झाल्यानंतर मात्र आता तक्रार व आरोप केले जात आहेत, शंका व्यक्त होत आहेत. त्यात काही तथ्य नाही.मतदानातील तफावतीबाबत कुणाल कुमार म्हणाले, काही निर्णय अधिकाऱ्यांनी टपाली मतदान एकूण मतदानात जमेस धरले तर काहींनी नाही. त्यामुळे बेरजेत फरक दिसतो आहे. अंतिम आकडेवारीत तो दुरूस्त होईल. त्यामळे एकाही प्रभागाच्या निकालात काही फरक पडणार नाही, असे कुणाल कुमार यांनी सांगितले. मतमोजणीनंतर दोन दिवस सुटी होती. अधिकारी, कर्मचारी सलग दोन दिवसांच्या कामाने थकले होते, त्यामुळे आता सर्व बेरजा करून अंतिम आकडेवारी जाहीर केली जाईल.>तक्रारी नाहीतप्रभाग क्रमांक १ कळस धानोरी येथील तक्रारीशिवाय एकही तक्रार आलेली नाही. तेथील तक्रारीची तपासणी सुरू आहे. मतदान यंत्रातील सर्व मते तसेच पोस्ट मतेही सुरक्षित आहेत. एक वर्षापर्यंत हा दस्तऐवज जपून ठेवण्यात येतो. निकाल लागल्यापासून १० दिवसांच्या आत न्यायालयीन तक्रार करावी लागते. तशी तक्रार झाली तरी प्रशासनाच्या कामकाजात पारदर्शीपणा असल्यामुळे सर्व माहिती लगेच उपलब्ध करून दिली जाईल, अशी माहिती कुणाल कुमार यांनी दिली.