शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन घोटाळ्यातील आरोपी पुराव्यांशी छेडछाड करतील, राज्य सरकाराला भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 05:51 IST

सिंचन घोटाळ्यातील आरोपींना जामीन मंजूर केल्यास ते पुराव्यांशी छेडछाड करतील, अशी भीती राज्य सरकारने व्यक्त केली आहे. तसेच, आरोपींना जामीन देण्यास जोरदार विरोध केला आहे. यासंदर्भात सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

नागपूर - सिंचन घोटाळ्यातील आरोपींना जामीन मंजूर केल्यास ते पुराव्यांशी छेडछाड करतील, अशी भीती राज्य सरकारने व्यक्त केली आहे. तसेच, आरोपींना जामीन देण्यास जोरदार विरोध केला आहे. यासंदर्भात सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.आरोपींमध्ये कंत्राटदार आर. जे. शाह कंपनी व डी. ठक्कर कन्स्ट्रक्शन कंपनी यांच्या संयुक्त उपक्रम कंपनीचे भागीदार कालिंदी राजेंद्र शाह, तेजस्विनी राजेंद्र शाह, विशाल प्रवीण ठक्कर, प्रवीण नाथालाल ठक्कर, अरुणकुमार गुप्ता, मुखत्यारपत्रधारक रमेशकुमार सोनी व गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पाचे वरिष्ठ विभागीय लेखाधिकारी चंदन तुळशीराम जीभकाटे यांचा समावेश आहे. यांच्यासह इतर आरोपींनी संगनमत करून गोसेखुर्द राष्ट्रीय सिंचन प्रकल्पांतर्गत येणाºया मोखाबर्डी उपसा सिंचन योजनेतील पुच्छ शाखा कालवा बांधकाम निविदा वाटपात गैरव्यवहार केला, असे सरकारचे म्हणणे आहे. या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात एकूण १२ आरोपींविरुद्ध ४,५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.या प्रकल्पाच्या निविदा प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्यात आली नाही. संयुक्त उपक्रम कंपनीला फायदा होईल, अशी कृती करण्यात आली. जबाबदारीच्या पैलूकडे दुर्लक्ष करून २००९ मध्ये कंपनीला कार्यादेश जारी करण्यात आला. संयुक्त उपक्रम कंपनीच्या नोंदणीची कागदपत्रे व भागीदारीचा करार उपलब्ध नाही. कंपनीने हे कंत्राट मिळविण्यासाठी त्यांच्याकडील दगडपारवा प्रकल्पाची माहिती लपवून ठेवली होती. त्यांनी गोपनीयता व पारदर्शी स्पर्धेच्या तत्त्वाची पायमल्ली केली. कंपनीकडे निकषानुसार अनुभव प्रमाणपत्र नाही. त्यामुळे आरोपींविरु द्ध एफआयआर नोंदविण्यात आला, असे सरकारने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.पुढील सुनावणी १२ मार्चलान्यायालयाने सोमवारी सरकारचे प्रतिज्ञापत्र रेकॉर्डवर घेऊन पुढील सुनावणी १२ मार्च रोजी निश्चित केली. तसेच, आरोपींवर कोणतीही सक्तीची कारवाई न करण्याचा अंतरिम आदेश पुढील तारखेपर्यंत कायम ठेवला.

टॅग्स :Courtन्यायालय