शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

खाते उघडलेच नाही!

By admin | Updated: October 20, 2014 00:37 IST

विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्यातील १२ मतदारसंघातून १३ महिला उमेदवार रिंगणात होत्या. मात्र त्यापैकी एकही महिला विधानसभेत पोहोचू शकली नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या

महिला उमेदवार : दुसऱ्या क्रमांकापर्यंत मारली मजलनागपूर : विधानसभा निवडणुकीसाठी नागपूर जिल्ह्यातील १२ मतदारसंघातून १३ महिला उमेदवार रिंगणात होत्या. मात्र त्यापैकी एकही महिला विधानसभेत पोहोचू शकली नाही. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकापर्यंतची मजल महिलांनी मारली. त्यात राष्ट्रीय पक्षाच्या महिला उमेदवारांचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील १२ मतदारसंघापैकी उमरेड, सावनेर आणि पूर्व नागपूर हे तीन मतदारसंघ वगळता इतर नऊ मतदारसंघातून महिला उमेदवार निवडणूक रिंगणात होत्या. पश्चिम नागपुरातून काँग्रेसच्या उमेदवार प्रगती पाटील यांनी ४०३१ मते घेतली. गोंडवाना गणतंत्र पक्षाच्या आनंदी सयाम यांनी २८२ तर अपक्ष उमेदवार अनिता टेकाम यांनी ३०९ मते घेतली. या मतदारसंघात प्रगती पाटील या चौथ्या क्रमांकावर राहिल्या. इतर दोन उमेदवार मात्र बऱ्याच मागे राहिल्या. हिंगणा मतदार संघातून काँग्रेसकडून निवडणूक लढविणाऱ्या कुंदा राऊत यांनी २० हजार ५७३ मते घेत चुरस निर्माण केली. त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. याच मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या अनिता टेकाम यांनी २९५ मते घेतली. कामठी मतदारसंघातून नंदा गजभिये या आंबेडकर राईट पार्टी आॅफ इंडिया तर हेमलता पाटील या बहुजन मुक्ती पार्टीकडून निवडणूक रिंगणात होत्या. त्यापैकी गजभिये यांनी ८०२ तर पाटील यांनी अवघी ३८० मते घेतली.काटोल, रामटेक, दक्षिण नागपूर, दक्षिण पश्चिम, मध्य आणि उत्तर नागपूर मतदारसंघातून प्रत्येकी एक महिला उमेदवार निवडणूक रिंगणात होती. दक्षिण नागपुरातून बसपाच्या सत्यभामा लोखंडे यांनी २३ हजार १५६ मते घेत तिसऱ्या क्रमांकावरपर्यंत पोहोचल्या. यासोबतच अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतलेल्यांपैकी मध्य नागपुरातून आभा पांडे यांनी ४४४९, काटोलमधून गायत्री घरत यांनी १७४०, रामटेकमधून राणी राजश्रीदेवी बुलंदशाह यांनी ३९१, दक्षिण - पश्चिममधून भारती मेश्राम यांनी २६७ आणि उत्तर नागपुरातून नीना वासनिक यांनी १८० मते घेतली. (प्रतिनिधी)५०० च्या घरात!विधानसभा निवडणूक रिंगणात उतरलेल्यांपैकी दोन उमेदवारांनी पाच अंकी (१० हजारावर), तीन उमेदवारांनी चार अंकी (पाच हजाराच्या आत) मते घेतली. सात महिला उमेदवार ५०० मतेही घेऊ शकल्या नाही. यामध्ये पश्चिममधून आनंदी सयाम (२८२), अनिता टेकाम (३०९), कामठीतून हेमलता पाटील (३८०), हिंगण्यातून अनिता टेकाम (२९५), रामटेकमधून राजश्रीदेवी बुलंदशाह (३९१), दक्षिण - पश्चिममधून भारती मेश्राम (२६७), उत्तर नागपुरातून नीना वासनिक (१८०) यांचा समावेश आहे. हजारावर मते घेणाऱ्यांमध्ये गायत्री घरत (१७४०), प्रगती पाटील (४०३१), आभा पांडे (४४४९) यांचा तर १० हजारांवर मते घेणाऱ्या महिला उमेदवारांमध्ये कुंदा राऊत (२०५७३), सत्यभामा लोखंडे (२३१५६) यांचा समावेश आहे.