शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दर पाच मिनिटांनी होतो एकाचा अपघाती मृत्यू

By admin | Updated: August 11, 2014 00:01 IST

मृत्यूचा घनता दर: अपघात रोखण्यासाठी शासन करणार प्रयत्न

बुलडाणा : रस्त्यावरील अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. खड्डे आणि बेशिस्त वाहतुकीमुळे अपघातात बळी पडणार्‍यांची संख्या मोठी असून, राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मृत्यू घनता दराची आकडेवारी निश्‍चित केली आहे. त्यानुसार दर पाच मिनिटांनी एकाचा अपघाती मृत्यू होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जागरुकता नाही. रस्त्यांवर सूचना फलकांचा अभाव, बेशिस्त वाहतूक, पादचार्‍यांचे रस्त्यांकडे होणारे दुर्लक्ष अपघातास कारणीभूत ठरते. रस्ते अपघातात महाराष्ट्राचा देशात चवथा क्रमांक लागतो. सर्वात जास्त अपघात होणार्‍या देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, ठाणे, नवी मुंबई आणि नाशिक या सहा शहरांचा समावेश आहे. त्यामुळे मृत्यूच्या घनता दराची आकडेवारी तयार करून त्या आधारे महामार्गावरील अपघाताच्या वाढत्या घटना कमी करण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करणार आहे.** गोल्डन अवरमध्ये सुविधाजीवितहानी रोखण्यासाठी अत्याधुनिक कंट्रोल रूम आणि टोल फ्री १0८ सेवा पुरविल्या जाईल. सर्वच खासगी तसेच सरकारी रुग्णालय, रुग्णवाहिका, शववाहिका, रक्तपेढी, पोलिस स्टेशन या सर्वांनाच अपघाताची माहिती तातडीने उपलब्ध होईल. ह्यगोल्डन अवरह्ण अर्थात तातडीच्या प्रसंगी मिळालेल्या या सुविधांनी जखमींना उपचार मिळू शकतील. ** सवरेत्तम आरोग्य सेवा मिळणारअपघात रोखण्यासाठी उत्तम पायाभूत सुविधा निर्माण करता याव्यात; शिवाय जिल्हा प्रशासन, परिवहन विभाग, पोलिस, बांधकाम विभाग, रस्ते प्राधिकरण, आरोग्य विभाग या सर्वच यंत्रणांनी रस्त्यावरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करावे, यासाठी मृत्यूचा घनता दर निश्‍चित करण्यात आला आहे. ** मृत्यूदर वाढण्याची भीतीलोकसंख्येची घनता १२३ प्रती वर्ग किमी आहे. म्हणजे १ वर्ग किमी भागात सरासरी १२३ व्यक्ती राहतात. मृत्यूच्या घनता दरानुसार पाच मिनिटाला यापैकी एकाचा मृत्यू हा रस्ते अपघातात होतो. सध्याच्या मृत्यूच्या घनता दरानुसार हे प्रमाण बघता, २0२0 पर्यंत तीन मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होण्याची भीती आरोग्य विभागाने वर्तविली आहे.