शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खालापूर-पेण मार्गावर अपघात

By admin | Updated: June 9, 2017 02:53 IST

खालापूर-पेण मार्गावरील सावरोली हद्दीत भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रेलर चालकाचा डोळा लागल्याने ट्रेलर थेट एका कारला धडकून कार्यालयात घुसला.

लोकमत न्यूज नेटवर्कवावोशी : मुंबई-पुणे महामार्गाला जोडणाऱ्या खालापूर-पेण मार्गावरील सावरोली हद्दीत भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रेलर चालकाचा डोळा लागल्याने ट्रेलर थेट एका कारला धडकून कार्यालयात घुसला. या घटनेत सुदैवाने कारमालक व येथील सुपरवायझर बचावला. तसेच या ठिकाणीची चहा नाष्ट्याची टपरी बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र कार व कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे.खालापूर- पेण हा महामार्गाला जोडरस्ता असल्याने या मार्गावरून जुन्या राष्ट्रीय महामार्गाला जाण्यासाठी चार किलोमीटर अंतर असलेल्या या मार्गावरून अनेक कारखान्यांचे कंटेनर ये-जा करीत असतात. गुरु वारी सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान मुंबई - पुणे द्रुतगती मागावरून रांजणगाव येथन माल खाली करून कंटेनर क्र . एम एच ४३ वाय.७०६१ चा चालक अंबादास खेडकर खालापूर पेण या जोड रस्त्यावरून मुंबईकडे जाण्यासाठी भरधाव वेगात जुन्या राष्ट्रीय महामार्गाकडे जात असताना, सावरोली हद्दीत पाताळगंगानजीक शिवसेना नेते गोविंद बैलमारे यांच्या वीटभट्टी लगतच्या कार्यालयात घुसला. या ठिकाणी राजेंद्र घोसाळकर हे व्यावसायिक आपली कार क्र . एम एच ०६ ए एन २६८ ही रस्त्याच्या बाजूला लावून येथील सुपरवायझर अशोक दळवी यांच्याबरोबर बोलत होते. याच दरम्यान सावरोली गावाकडून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रेलरवरील चालक अंबादास खेडकर यांचा वळणावर गाडीवरील ताबा सुटून ट्रेलर येथे उभ्या असणाऱ्या कारला मागून धडकला, तो थेट कार्यालयात घुसला. याच दरम्यान कार मालक राजेंद्र घोसाळकर व सुपरवायझर अशोक दळवी काही क्षणापूर्वी कारपासून दोन फूट बोलत बाजूला गेल्याने, बचावले. तर याच कार्यालयाबाहेर असलेली चाहा नाष्ट्याची टपरी या वेळेस बंद असल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातातील चालक अंबादास खेडकर याने आपला डोळा लागल्याचे सांगत गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाल्याचे कबूल केले. अपघातात कारचे व कार्यालयाचे मोठे नुकसान झाले आहे.>कार आराम बसच्या धडकेत पाच जखमीबिरवाडी : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील मौज चांढवे गावाजवळ कार आणि आराम बस अपघातामध्ये एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले. यामध्ये आई-वडील व तीन लहान मुलांचा समावेश आहे. वडील दिगंबर दिघे, आई वृषाली दिगंबर दिघे (४५), मुलगी वैभवी दिघे (१०), वैष्णवी दिघे (१३), मुलगा वेदांत दिघे (८) सर्व रा. पिंपळदरी ता.महाड हे गंभीर जखमी आहेत. महाड एमआयडीसी पोलिसांनी जखमींना ग्रामीण रु ग्णालयमध्ये दाखल केले आहे.