शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

नगर रस्ता बीआरटी मार्गावर उद्घाटनाआधीच अपघात

By admin | Updated: April 28, 2016 00:48 IST

वर्दळीच्या नगर रस्त्यावर महापालिकेकडून प्रवासी तसेच इतर वाहतुकीची सुनियोजित यंत्रणा उभारण्याआधीच बीआरटी सेवा सुरू करण्याची घाई सुरू आहे.

पुणे : वर्दळीच्या नगर रस्त्यावर महापालिकेकडून प्रवासी तसेच इतर वाहतुकीची सुनियोजित यंत्रणा उभारण्याआधीच बीआरटी सेवा सुरू करण्याची घाई सुरू आहे. या मार्गाचे गुरुवारी (दि. २८) उद्घाटन होणार असतानाच बुधवारी पहाटे या मार्गावर टाटा गार्डरूमजवळील बसथांब्याजवळ बीआरटी मार्गात कार उलटल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात चौकातून पायी जाणारा पादचारी गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती पोलिसांकडे नसली तरी पीएमपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेस दुजोरा दिला असून, बीआरटी सुरू झाल्यानंतर या मार्गावर मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार असल्याचे या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, संबंधित कारचालक हा नगरकडे निघाला असताना टाटा गार्डरूमजवळ बीआरटी मार्गातून पुढे जाताना, स्थानकातून प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी रस्त्यावर लावण्यात आलेल्या स्टिलच्या बोलार्डचा कारचालकास अंदाज आला नाही. त्यामुळे बोलार्डला धडक बसून कार रस्त्यावर पलटी झाली. या वेळी कारचा धक्का लागून एक जण जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या मार्गावर सुरक्षा नियमांनुसार, बसथांब्याचे काम पूर्ण झालेले नाही. तसेच प्रवासी स्थानकातून बाहेर पडल्यानंतर मुख्य रस्ता ओलांडण्यासाठी या मार्गावर विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे या मार्गावरील संचलन तातडीने थांबवावे, अशी मागणी पीएमपी प्रवासी मंचाचे अध्यक्ष जुगल राठी यांनी केली आहे. या मार्गाचे तसेच बसस्थानकांचे कोठेही सुरक्षा आॅडिट झाले नसल्याने आधी आॅडिट करून सुरक्षा त्रुटी दूर कराव्यात; त्यानंतरच संचलन सुरू करावे, अशी मागणी राठी यांनी केली आहे. संघटनेच्या वतीने मंगळवारी या मार्गाची पाहणी केली असता, टर्मिनलचे अर्धवट काम, बसथांब्यांवर आयटीएमएस यंत्रणा कार्यान्वित नसणे, बीआरटी मार्गावर मुख्य चौकांमध्ये तोडण्यात आलेले दुभाजक, बसस्थानकांचे स्वयंचलित दरवाजे बंद असणे, बसस्थानकांवर कायमस्वरूपी विद्युतपुरवठा नसणे अशा एक ना अनेक त्रुटी आढळून आलेल्या आहेत. त्यामुळे घाईगडबडीने हा मार्ग सुरू करण्यात येऊ नये, अशी मागणी संघटनेने केली आहे.