शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

आयटीआयची प्रवेशक्षमता ५० हजारांनी वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 07:08 IST

कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री रणजित पाटील यांची विधानपरिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील आयटीआयची प्रवेश क्षमता ५० हजारांनी वाढविणार असल्याचे कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री रणजित पाटील यांनी विधानपरिषदेत सांगितले.राष्ट्रवादीचे जगन्नाथ शिंदे याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेला उत्तर देताना पाटील म्हणाले की, तरुणांना व्यवसाय प्रशिक्षणासाठी शासनाने प्रत्येक तालुक्यामध्ये एक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात ४१७ शासकीय व ४२५ खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहेत. त्यातून इयत्ता १०वी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी एक ते दोन वर्षांचे अभियांत्रिकी व बिगर अभियांत्रिकी अशा ७९ प्रकारच्या व्यवसाय अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षण देण्यात येते. या संस्थामध्ये प्रत्येक वर्षी १ लाख ४० हजार जागा उपलब्ध असतात.तंत्रनिकेतन (पॉलिटेक्नीक) मध्येही आयटीआयचे कोर्स सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यभरात आयटीआयच्या प्रवेशासाठी जिथे मागणी असेल तिथे कोर्स सुरु केले जातील. तसेच प्रवेश क्षमता व तुकड्यांची संख्याही वाढविली जाईल. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. आयआयटीतील अद्ययावत यंत्रसामुग्रीची आवश्यकता भासेल तिथे ते देण्यात येईल. कल्याण येथील आयआयटी या वर्षीच्या शैक्षणिक वषार्पासून सुरु करण्यात येईल, असेही पाटील म्हणाले.

टॅग्स :iti collegeआयटीआय कॉलेज