शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

२ हजार गावांत पोहोचली ‘अस्मिता’, २ हजार ३७२ बचतगटांची नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 05:15 IST

अस्मिता योजनेतून किशोरवयीन मुली आणि महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी वितरक म्हणून आठवडाभरात २ हजार ३७२ बचतगटांनी नोंदणी केली आहे.

मुंबई : अस्मिता योजनेतून किशोरवयीन मुली आणि महिलांना स्वस्त दरात सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देण्यासाठी वितरक म्हणून आठवडाभरात २ हजार ३७२ बचतगटांनी नोंदणी केली आहे. अस्मिता फंडालाही लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत ११ हजार ४३९ मुलींच्या सॅनिटरी नॅपकिनसाठी ५१८ जणांनी स्पॉन्सरशिप स्वीकारली आहे. यातून सुमारे २० लाख ८६ हजार रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.किशोरवयीन मुलींना फक्त ५ रुपयांत तर महिलांना स्वस्त दरांत सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध करून देणे तसेच त्याच्या वितरण व्यवसायातून बचतगटांच्या महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या दुहेरी उद्देशाने नुकताच जागतिक महिला दिनी अस्मिता योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. सॅनिटरी नॅपकिनच्या विक्रीसाठी आवश्यक असलेल्या मोबाइल अ‍ॅपवर नोंदणी करण्यासाठी मागील आठ दिवसांत बचतगटांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लवकरच राज्यातील प्रत्येक गावातील किमान एक बचतगट या अ‍ॅपवर नोंदणीकृत होण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन व्यापक प्रयत्न करीत आहे. बचतगटांची नोंदणी झाल्यानंतर लगेच सॅनिटरी नॅपकिनची प्रत्यक्ष विक्री सुरू केली जाणार आहे.>अस्मिता रथाचे स्वागतमासिक पाळीविषयक विविध अंधश्रद्धा, गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने राज्याच्या विविध भागांतून सध्या २ अस्मिता रथ फिरत असून मुली आणि महिलांनी अस्मिता रथाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. जिल्हा परिषद शाळांमधील मुलींना ‘पॅडमॅन’ हा चित्रपट दाखविण्यात येत आहे.<महिलांमध्ये मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी नॅपकिन वापराचे प्रमाण सध्या फक्त १७ टक्के इतके आहे. पहिल्या वर्षात ग्रामीण भागात हे प्रमाण ७० टक्के इतके करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.- पंकजा मुंडे(मंत्री, महिला व बालकल्याण)