शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याच्या गावाला ‘कॅशलेस’चे ग्रहण, रोकड टंचाई; किरकोळ बाजारपेठ ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 05:44 IST

नोटाबंदी व जीएसटीनंतर १० हजारांवरील व्यवहार कॅशलेस झाल्याने, आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावला ग्रहण लागले आहे.

योगेश बिडवईमुंबई : नोटाबंदी व जीएसटीनंतर १० हजारांवरील व्यवहार कॅशलेस झाल्याने, आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगावला ग्रहण लागले आहे. चार महिन्यांपासून कांदा व्यापाºयांनी शेतकºयांना चेकने पैसे देणेसुरू केल्याने, रोकड टंचाईमुळे गावातील व्यापार ठप्प झालाआहे. यामुळे लासलगावची दररोजची सुमारे दोन कोटींची उलाढालआता केवळ ५० लाखांवर आली आहे.सरकारने ५०० व १००० रुपयांच्या जुन्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या नोटाबंदीनंतर गेल्या वर्षी रोकडअभावी कांदा मार्केट दोन महिने जवळपास बंद असल्यासारखी स्थिती होती. त्याचा व्यावसायिकांना फटका बसला. आता शेतकºयांना चेक देणे सुरू झाले आहे. ते पैसे दोन-तीन दिवसांत खात्यात जमा होत आहेत. त्यामुळे कांदा विकल्यानंतर गावी जाण्यापूर्वी लासलगावातून आवश्यक वस्तूंची खरेदी करणे शेतकºयांनी बंद केले आहे.लासलगाव येथील बाजारपेठेत किराणा, कापड, वाहनांचे स्पेअरपार्ट, खते, बी-बियाणे, शेतीची अवजारे आदींचे डिलर्स आहेत. अपेक्षित व्यवसायाअभावी ते अडचणीत आले आहेत. त्यामुळे व्यापाºयांनी एकत्र येत, त्यावर मार्ग काढण्यासाठी महासंघ स्थापन केला आहे.रोख व्यवहार हवेत‘कॅशलेस’च्या संकटातून बाहेर पडण्यासाठी गावातील सर्व व्यापाºयांनी शनिवारी बैठक घेतली. कांदा व्यापाºयांनी शेतकºयांना किमान १० हजार रुपये रोख देण्याची मागणी त्यांनी लासलगाव बाजार समितीकडे केली आहे.लाखो रुपये गुंतवणूक करून व्यापाºयांनी व्यवसाय सुरू केले. कांद्याचे व्यापारी चेकने पैसे देत असल्याने, व्यापार रोडावला आहे. हे असेच सुरू राहिले, तर व्यापारी देशोधडीला लागतील.- सुनील आब्बड, समन्वयक, व्यापारी महासंघकॅशलेसच्या आदेशामुळे कांदा व्यापारी शेतकºयांना चेकने पैसे चुकते करतात. धान्य बाजारात मात्र, छोटे व्यवहार असल्याने शेतकºयांना रोख पैसे मिळतात. कॅशलेस म्हणजे केवळ चेकने पैसे देणे नव्हे. त्याऐवजी व्यापारी एनईएफटी व डीडीद्वारेही शेतकºयांना पैसे देऊ शकतात. विंचूर उपबाजार आवारात व्यापारी एनईएफटीद्वारे शेतकºयांना पैसे देत आहेत.- बी. वाय. होळकर, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, लासलगावदररोज अडीच कोटींच्या कांद्याची खरेदीलासलगावला रोज साधारणपणे १० हजार क्विंटल कांद्याची आवक होते. क्विंटलमागे सरासरी अडीच हजार रुपये भाव धरला, तर रोज २ कोटी ५० लाख रुपये शेतकºयांना वाटप केले जातात. ही रक्कम चेकने देण्यात येत आहे.