शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांत मागन्या मान्य करा अन्यथा...

By admin | Updated: June 8, 2017 14:58 IST

सरकारनं 2 दिवसांत मागण्या मान्य कराव्यात, मागण्या मान्य न केल्यास 13 जूनपासून निर्णायक लढा करण्याच येईल असे सुकाणू समिती बैठकीत नवले म्हणाले.

ऑनलाइन लोकमतनाशिक, दि. 8 - सरकारनं 2 दिवसांत मागण्या मान्य कराव्यात, मागण्या मान्य न केल्यास 13 जूनपासून निर्णायक लढा देण्यात  येईल, असा इशारा सुकाणू समितीत देण्यात आला. शेतकरी संपाची पुढील दिशा ठरवण्यासाठी नाशिक येथे बैठक घेण्यात आला.  शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी यासाठी राज्यात सुरू असलेल्या शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आयोजित परीषदेत गोंधळ उडाला. शेतकरी संप राजकारण विरहीत असल्याचे सांगितले जात असताना खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चु कडू व्यासपीठावर कसे असा प्रश्न एका महिला कार्यकर्तीने व्यासपीठावर माईकचा ताबा घेऊन केला. त्यामुळे गोंधळ उडला. सदर महिलेच्या माईकचा ताबा घेऊन तीला व्यासपीठावरून उतरवून देण्यात आले.

नाशिकच्या तुपसाखरे लॉन्स येथे सदरची बैठक आता काही वेळापूर्वीच सुरू झाली आहे. व्यासपीठावर स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजु शेट्टी, आमदार बच्चु कडू, कॉँग्रेसचे आमदार भाई जगताप, रघुनाथदादा पाटील यांच्यासह अनेक नेते स्थानापन्न आहेत अशावेळी एका कार्यकर्तीने व्यासपीठावर जाऊन आपल्याला दोन मिनीटे बोलायचे आहे, असे सांगून माईक ताब्यात घेतला. शेतकरी संप राजकीय पक्षांच्या विरहीत असल्याचे सांगितले जात असताना व्यासपीठावर सरकारात सहभागी असलेले राजू शेट्टी आमदार बच्चुभाई कडू कसे असा प्रश्न सदर महिलेने विचारताच गोंधळाला सुरूवात झाली. कॉ.राजू देसले यांनी महिलेच्या समोरील माईक हटवून घेतला आणि तातडीने कार्यकर्त्यांनी या महिलेला दूर करण्याचा प्रयत्न केला. गोंधळ आणि घोषणाबाजी सुरू झाल्याने पोलीसही तत्काळ व्यासपीठावर गेले आणि त्यांनी त्या महिलेला सभागृहातून बाहेर आणले. आपण मुंबई येथून आल्याचे आणि शेतकऱ्यांसाठी काम करीत असून कोणत्याही पक्षाशी संबंधीत नसल्याचे त्या महिलेने सांगितले. कल्पना निमसे असे आपले नाव या महिलेने सांगितले. दरम्यान, या महिलेला पोलीसांनी ताब्यात घेतला.

दरम्यान, या वेळी प्रारंभीक भाषणातच शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी सुकाणू समितीने मान्यता दिली. त्याच बरोबर १२ जून रोजी राज्यातील सर्व तहसील कार्यालये आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या तर १३ जूनला राज्यव्यापी चक्काजाम, रेलरोको करण्याचा इशारा देण्यात आला. सरकारने दोन दिवसात निर्णय न घेतल्यास अशाप्रकारे आंदोलने अधिक तीव्र करण्याचे ठरविण्यात आले.