मुंबई : देशव्यापी संपामुळे आर्थिक व्यवहार ठप्प पडले असताना अनुदानित आणि विनाअनुदानित शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांनी बंदमध्ये सामील झाल्याची घोषणा केली. शिक्षणाच्या हक्कासाठी विविध १७ संघटनांमधील हजारो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी चर्नी रोड येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयापासून राजभवनावर धडक मोर्चा काढला.पोलिसांनी केलेल्या मध्यस्थीनंतर मोर्चा पोलीस जिमखाना मैदानात वळविण्यात आला. या वेळी शिक्षक आमदार कपिल पाटील म्हणाले की, २८ आॅगस्टचा काळा शासन निर्णय सरकारने तत्काळ रद्द करायला हवा. महाराष्ट्र राज्य अशासकीय आयटीआय प्राचार्य व कर्मचारी संघटनेने शुक्रवारी संपात सामील होण्याची घोषणा केली. आयटीआय प्रवेशासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत, म्हणून संघटनेने प्रत्येक आयटीआयवर एक प्रतिनिधी ठेवला होता, असे संघटनेचे अध्यक्ष संजय बोरस्ते यांनी सांगितले.संपात सामील झालेल्या शैक्षणिक संघटना -महाराष्ट्र राज्य अशासकीय आयटीआय प्राचार्य व कर्मचारी संघटना, एमफुक्टो, एएनजीसी, बुक्टो, शिक्षक भारती, शिक्षण हक्क कृती समिती, महामुंबई संस्थाचालक संघटना, मुख्याध्यापक संघटना, रात्र प्रशाला मुख्याध्यापक संघ, प्राथमिक शिक्षक भारती, अनुदानित शिक्षा बचाव समिती, शिक्षक भारती ज्युनिअर कॉलेज युनिट, आर्च बिशप शाळा, सीसीटीओबी, शिक्षक भारती मनपा युनिट, अंजुमन इस्लाम खैरुल इस्लाम उर्दू शाळा, शिक्षक भारती आश्रमशाळा विभाग, नॉन गव्हर्नमेंट कॉलेज असोसिएशन, कला-अध्यापक संघटना, अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ, मुंबई शारीरिक शिक्षण मंडळ शिक्षक संघटना, महाराष्ट्र राज्य अनुदानित शारीरिक शिक्षक संघटना, शारीरिक शिक्षण शिक्षक युनिट या संघटना सहभागी झाल्या होत्या. राज्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांनी संपात सक्रिय सहभाग घेतल्याने १ लाख अंगणवाड्या बंद होत्या. (प्रतिनिधी) वांद्रे येथे रुग्णांचे हालवांद्रे येथील नागरिक स्वास्थ्य केंद्र संपात सामील झाल्याने रुग्ण सेवेवर परिणाम झाला. कर्मचारी संपात उतरल्याने येथील रक्ततपासण्यांसह महत्त्वाच्या तपासण्या आज बंद होत्या. दरम्यान ओपीडी सुरू असल्याने काही रुग्णांना दिलासा मिळाला.
शैक्षणिक आंदोलनाने संपाची तीव्रता वाढली
By admin | Updated: September 3, 2016 02:00 IST