शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

'सामना'च्या अग्रलेखात गलिच्छ भाषा, रश्मी ठाकरेंना पत्र लिहीणार: चंद्रकांत पाटील

By जयदीप दाभोळकर | Updated: January 1, 2021 13:40 IST

Chandrakant Patil : औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालं पाहिजे असं आपण म्हटलं होतं. त्यावेळी सामनानं अत्यंत गलिच्छ शब्दात अग्रलेख लिहिला होता. या विषयी रश्मी ठाकरे यांना एक पत्र लिहिणार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले.

ठळक मुद्देसंपादकीयमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेवरून रश्मी ठाकरेंकडे तक्रार करणार असल्याची पाटील यांची माहितीमुंबई महानगरपालिका निवडणुकांवरही केलं भाष्य

काही दिवसांपूर्वी सामनाच्या संपादकीयमधून भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधण्यात आला होता. दरम्यान, सामनाच्या संपादकीयमध्ये वापरण्यात आलेल्या भाषेवरून आपण सामनाच्या संपादिका रश्मी ठाकरे यांना पत्र लिहिणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं. "मी संभाजीनगरला काही प्रवासानिमित्त गेलो होतो. त्यावेळी मी औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर झालं पाहिजे असं म्हटलं होतं. त्यावेळी सामनानं माझ्यावर अत्यंत गलिच्छ शब्दात अग्रलेख लिहिला होता. या विषयी मी रश्मी ठाकरे यांना एक पत्र लिहिणार आहे. तुम्ही संपादिका आहात. याचा अर्थ अग्रलेख हा तुमच्या नावानं लागतो," असं पाटील म्हणाले. संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारची भाषा वापरली ती भाषा रश्मी ठाकरे या संपादिका असलेलं संपादकीय असूच शकत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. मुंबई मनपावरही भाष्य"मुंबई महानगरपालिका ही काही जणांची जहागीर झाली. अनेक राज्यकर्त्यांनी त्या त्या वेळी मुंबई महानगरपालिका त्यांना राहू दे असं म्हटलं. त्याच्यातून पैसे निर्माण करत, राजकारण करत आता अशी वेळ आली आहे की मुंबईकरांच्या नागरी समस्या आता बाजूला राहिल्या आहेत. राजकारणात मजबूत होण्याचाही प्रयत्न करू लागले. या अनैसर्गिक सरकारमध्ये ते आता ही मजबूतीही घालवून बसणार आहेत. मुंबई महानगरपालिकेसहित २०२२ मध्ये अनेक निवडणुका आहेत त्या जिंकणं आमचं लक्ष्य आहे," असंही पाटील म्हणाले.

 

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलPoliticsराजकारणAurangabadऔरंगाबाद