शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
2
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
3
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
5
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
6
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
7
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
10
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
11
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
12
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
13
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
14
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
15
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
16
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
17
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
18
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
19
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
20
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 

अबू सालेमची युरोपियन कोर्टात धाव

By admin | Updated: June 18, 2017 13:36 IST

1993 साली मुंबईत बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला कुख्यात डॉन अबू सालेम याने आता शिक्षेच्या कचाट्यातून सुटण्यासाठी कायदेशीर

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 18 -  1993 साली मुंबईत बॉम्बस्फोटाप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला कुख्यात डॉन अबू सालेम याने आता शिक्षेच्या कचाट्यातून सुटण्यासाठी कायदेशीर डावपेच खेळण्यास सुरुवात केली आहे. सालेमने युरोपियन कोर्टात धाव घेतली आहे. आपल्याला पोर्तुगालला परत नेण्याची मागणी त्याने केली आहे.  पोर्तुगालमध्ये अटक करण्यात आल्यानंतर अबू सालेमचं अटी शर्तींसह भारताकडे प्रत्यार्पण करण्यात आले होते. त्यावेळी सालेमला फाशी आणि दीर्घ कारावासाची शिक्षा होणार नाही, अशी अट पोर्तुगाली न्यायालयाने घातली होती. दरम्यान सालेमला दोषी ठरवल्यानंतर टाडा न्यायालय उद्या त्याला शिक्षा सुनावणार  आहे.  
सालेमने युरोपियवन कोर्टात केलेल्या याचिकेत भारतात आपल्यावर बेकायदेशीर रीत्या कारवाई करण्यात येत असून, तसेच त्याने कारागृहातील जागेबाबतही तक्रार नोंदवली आहे. आपल्याला अशा कोठडीत ठेवण्यात आले आहे. जिथे सूर्यप्रकाशसुद्धा येत नाही असे त्याने म्हटले आहे.   देशाला हादरवून सोडणाऱ्या मुंबईतील १९९३च्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी कुख्यात गुन्हेगार अबू सालेम आणि मुस्तफा डोसासह सहा जणांना विशेष टाडा न्यायालयाने शुक्रवारी दोषी ठरवले होते. मात्र त्यांना देशाविरुद्ध युद्ध छेडल्याच्या आरोपाखाली दोषी ठरवण्यास न्यायालयाने नकार दिला. या सर्वांनी बाबरी मशीद पाडल्याचा सूड घेण्यासाठी, तसेच काही नेत्यांना व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी बॉम्बस्फोटाचा कट रचला व अंमलात आणल्याचे निरीक्षण विशेष न्यायालयाने नोंदवले.