शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

अबब! १४ हजार पदांसाठी सुमारे ५ लाख अर्ज

By admin | Updated: February 14, 2017 04:13 IST

बेरोजगारांसाठी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन प्रत्येक सरकारकडून दिले जात असतानाच, तसे प्रत्यक्षात होताना दिसत नाही.

मुंबई : बेरोजगारांसाठी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन प्रत्येक सरकारकडून दिले जात असतानाच, तसे प्रत्यक्षात होताना दिसत नाही. त्यामुळे बेरोजगारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच जाते. याचे उदाहरण म्हणजे, एसटी महामंडळाच्या भरती प्रक्रियेला मिळालेला प्रतिसाद. एसटी महामंडळाकडून चालक तथा वाहक, लिपिक-टंकलेखक, सहायक व पर्यवेक्षक दर्जाच्या एकूण १४,२४७ रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी अर्ज मागवले. एसटीच्या या भरती प्रक्रियेला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि तब्बल ४ लाख ९७ हजार ७५३ अर्ज प्राप्त झाले. यात लिपिक-टंकलेखकच्या २ हजार ५४८ पदांसाठी पावणे दोन लाख अर्ज आले आहेत. एसटीच्या आगरक्षक या एका पदासाठी ३ हजार ९७३ अर्ज मिळाले असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. एसटी महामंडळात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने, सध्याच्या कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडतो. हे लक्षात घेता, एसटी महामंडळाने १४ हजार २४७ रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला. एसटी महामंडळाच्या वेबसाइटवर अर्ज भरण्याची प्रक्रिया १२ जानेवारी २0१७ पासून उपलब्ध करण्यात आली. ही मुदत ११ फेब्रुवारी रोजी संपुष्टात आली. अखेर एसटी महामंडळाला ४ लाख ९७ हजार ६९५ इतके अर्ज प्राप्त झाले. यात चालक तथा वाहक पदासाठीही ६८ हजार ८३५ अर्ज आले आहेत. चालक तथा वाहकांच्या एकूण ७ हजार ९२३ रिक्त जागा आहेत. त्यामुळे या पदालाही चांगला प्रतिसाद मिळाला. सहायकच्या (मेकॅनिक) ३ हजार २९३ रिक्त जागांसाठी ८३ हजार ४९८, तर भांडार पर्यवेक्षकच्या दोन पदांसाठी ६ हजार ५२२ अर्ज आल्याचे सांगण्यात आले.